णे | शहरात दररोज नव्या 1000 किंवा त्यापेक्षा अधिक कोरोनाग्रस्तांची नोंद होत आहे. त्यामुळे शहरातील अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या प्रशासनाला धडकी भरवणारी आहे. याच संसर्गवाढीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यात लॉकडाऊन जाहीर केला आहे. आजपासून 23 तारखेपर्यंत पुण्यात लॉकडाऊन असणार आहे.पुण्यात काय बंद राहणार?

- किरणा दुकाने, भाजी विक्री, मटन, अंडी, चिकन, मासे (14 ते 18 जुलै)
- ऑनलाईन खाद्यपदार्थ, वस्तूंची डिलिव्हरी
- मॉर्निंग वॉक, इव्हिनिंग वॉक, बाग, क्रिडांगणे आदी
- हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल
- सलून, ब्यूटी पार्लर
- शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था
- दुचाकी, तीन चाकी, चार चाकी वाहतूक बंद (फक्त पासधारकांनाच परवानगी)
- बांधकामे (ज्या ठिकाणी कामगारांच्या निवासीच व्यवस्था आहे, तेथे काम सुरू ठेवता येणार)
- मंगल कार्यालये, लग्न समारंभ आदी
-सर्व खासगी कार्यालये

पुण्यात काय सुरू राहणार ?
आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

- पेट्रोल पंप व गॅस पंप सकाळी 9 ते दुपारी 2 पर्यंत खुली राहणार (फक्त पासधारकांनाच इंधन, गॅस मिळणार)
- दूध आणि वृत्तपत्रांचे घरपोच वितरण
- सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा, ऑनलाईन औषध सेवा
- मेडिकल दुकाने, औषधांची घरपोच डिलिव्हरी
- गॅस वितरण
- बॅंका (ग्राहकांना बँकेत जाता येणार नाही), एटीएम
- माहिती तंत्रज्ञान उद्योग 15 टक्के कर्मचाऱ्यांसह
पुण्यात कोणाला घराबाहेर पडता येणार?
डॉक्टर, नर्स, केंद्र आणि राज्य सरकारचे कर्मचारी, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, दूध विक्रेते, वृत्तपत्र विक्रेते, अंगणवाडी सेविका, मेडिकल दुकानचे कर्मचारी, बी- बियाने विक्री करणारे, महावितरण, स्वच्छता कर्मचारी, पाणी पुरवठा, शहरातून जिल्हा आणि पिंपरी चिंचवडमध्ये जाणारे कामगार , जीवनावश्यक वस्तू, पार्सल, डबे पुरविणारे
