सरकारचे अपयश झाकण्यासाठी राऊत जनतेची दिशाभूल करत आहे – चंदक्रांत पाटील
विरोधी पक्षातील नेते मंडळी ऑक्टोबरपर्यंत सरकार पडण्याच्या हालचाली सुरु आहे. असा आरोप शिवसेनेच्या सामनाच्या अग्रलेखातून खासदार संजय राऊतांनी भाजपा पक्षावर लावला होता. आता या आरोपाला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीच चोख उत्तर दिले आहे.


पाटील यांनी म्हटलं की, ‘खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा सामनामधून भाजपा ऑक्टोबरपर्यंत सरकार पाडण्याचा प्रयत्न करेल असा आरोप केला आहे. मुळात राऊतांना तिन्ही पक्षामधील अतंर्गत भांडणावरुन सरकार पडेल अशी भीती आहे. जी ते भाजपाच्या नावाने बोलवून दाखवत आहेत.’
कोरोना सारख्या गंभीर परिस्थितीत आज महाराष्ट्र अडकला आहे. त्यापेक्षा तुम्हाला भाजपावर आरोप करणे महत्त्वाचे वाटते का? सरकार पडण्याचा मुद्दा जास्त महत्त्वाचा वाटतो का? राज्य सरकारचा प्रत्येक प्रयत्न हा गेल्या तीन महिन्यांपासून दिशाहिन असल्याचे संपूर्ण देशाला माहित आहे.’ असे देखील चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
फक्त केंद्र सरकारच्या चीन विरुद्धच्या कारवाईला मनाला येईल तशी टीका करणं आणि भाजप हे सरकार पाडू बघत आहे अशी विधानं करणं एवढंच वाचायला मिळतं. मी मांडलेल्या समस्यांवर कधी बोलणार?’ असा प्रश्न देखील चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे.