घरपट्टी माफी व अतिवृष्टी नुकसानीची भरपाई साठी बार्शीत राजेंद्र मिरगणे यंग ब्रिगेड व शिवसेनेचा मोर्चा
बार्शी: शहरातील नागरिकांच्या विविध समस्यांबाबत व घरपट्टी माफी आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी या प्रमुख व अन्य मागण्यांसाठी राजेंद्र मिरगणे यंग ब्रिगेड व बार्शी शहर शिवसेनेच्या वतीने पोतराज मोर्चा काढण्यात आला.या मोर्चाचे नेतृत्व महाहौसिगचे माजी सहअध्यक्ष राजेंद्र मिरगणे व स्थानिक शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी केले.

बआर.एस.एम हाईटस् , तेलगिरणी चौक येथून या मोर्चाला सुरुवात झाली. पालिका सत्ताधारी व प्रशासनाचा निषेध करणाऱ्या पोतराज मोर्चात हलग्या वाजवत व आसूड मारून घेत पोतराज नाचत होते. या मोर्चात संयोजक ब्रिगेडचे अध्यक्ष राजेंद्र गायकवाड व शिवसेना शहरप्रमुख दिपक आंधळकर यांच्यासह दिनेशसिंह परदेशी, माजी नगरसेवक राजाभाऊ काकडे, साहेबराव देशमुख, अश्विन गाढवे, कुणाल घोलप, शिरीष घळके, ऍड.नितेश सोडळ, रामराजे पवार, महेदिमियॉ लांडगे, सुरज गव्हाणे, सुर्यकांत देशमुख, बाबा शेख, जहॉगीर शेख, शरीफ शेख, अरूणभाऊ कापसे, बाळासाहेब पवार, सुनिता जाधव, सुनंदा चव्हाण, प्रतिभा मुळीक, युवराज वाघमारे, शाम शिंदे, अविनाश शिंदे, अतिष बिसेन, रॉनी सय्यद यांच्या उपस्थितीमध्ये निघाला. यांच्यासह शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या.आदी उपस्थित होते . नगरपालिकेसमोर बोलताना राजेंद्र मिरगणे म्हणाले , शहरातले नागरिक गेली ४ वर्षे नगरपालिकेतील भ्रष्टाचारी सत्ताधाऱ्यांच्या गैरकारभाराला अक्षरश : त्रासलेले विटलेले आहेत .
त्यातच भर म्हणून सध्या शहरात जबरदस्तीने घरपट्टी व मालमत्ता कर आकारणी वेगात सुरू आहे . लॉकडाउन्नमुळे रोजगाराचे साधन हिरावले व अतिवृष्टीमुळे घरे व दुकानात पाणी शिरून नुकसान झालेल्या अनेक बार्शीकरांने आमची घरपट्टी भरण्याची ऐपत नाही . त्यामुळे पालिकेने घरपट्टी माफ करावी अशी मागणी केली .


तसेच आम्ही मार्च २०२० मध्ये नगरपालिकेला निवेदन देऊन भुयारी गटारी योजनेच्या चुकीच्या अंमलबजावणीबाबत तसेच निकृष्ट दर्जाच्या व तांत्रिकदृष्टया सदोष रस्ते कामांकडे पालिकेचे लक्ष वेधले होते . मात्र गैरकारभाराकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले . आता १४ ऑक्टोंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे अगोदरच खराब असलेले रस्ते अधिक खराब झाले .
सोलापूर रोडच्या रस्त्यांची उंची दुर्तफा घरांच्या व दुकानांच्या जोता पातळीपेक्षा २ ते ३ फुटापेक्षा जास्त असल्याने पावसाचे पाणी घरात व दुकानात गेले . हा कायम स्वरूपी त्रास असून या भागातील घरांचे व दुकानांचे जोती पातळी रस्त्याच्या बरोबरीने जगरपालिकेने वाढवून देणे गरजेचे आहे . शहराच्या विविध भागातही अनेक घरात व दुकानात पाणी गेले . या शहरात प्रतिवर्षी कोट्यावधी रुपयांची बिले उचलून देखील रस्ते स्वच्छ करणे व गटारीतील गाळ काढणे हे काम व्यवस्थित झालेले नाही . त्यामुळे या गटारीतील गाळ व घाण पाणी रस्त्यावर आले व ते जागरिकांच्या घरात आणि दुकानात घुसले .
भाऊसाहेब आंधळकर म्हणाले , नुकसानीची तातडीने पंचनामे करून नागरिकांना भरपाई मिळाली पाहिजे अशी मागणी केली. चार वर्षात बार्शीची दुरावस्था झाली. बार्शीमध्ये सर्व बेकायदेशीर धंदे सुरू आहेत. पालिकेतही भ्रष्टाचार आणि नागरिकांची अडवणूक सुरू आहे. नागरिकांच्या प्रश्नांसाठी आवाज उठविणार्यांच्या विरोधात खोटे गुन्हे दाखल करून त्यांची मुस्कटदाबी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पालिकेच्या रस्त्यावरील खड्डयांमुळे किती नागरिकांना अपघातांना तोंड द्यावे लागले याची मोजदाद नाही. सत्ताधार्यांनी शहरात झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीचे अहवाल शासनाला सादर केले तर मुख्यमंत्र्याकडे पाठपुरावा करून भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू. पक्ष वेगवेगळे असले तरी स्थानिक राजकारणात आमची मिरगणें बरोबरची ऐकी कायम राहील.
.यावेळी मोर्चेकऱ्यानी पालिका विरोधी फलक हातात घेऊन घोषणा दिल्या.तसेच आंदोलनाच्या शेवटी बंद असलेल्या पालिकेच्या गेटवर खापरी मडकी फोडण्यात आली.