बार्शी तालुक्यातील सोरोळे येथे दोन गटात राडा; चौदा जणांवर गुन्हा दाखल

0
459

वैराग: सोरोळे ता.बार्शी येथे दोन गटात मारहाण झाली. या मारहाणीत भगत चौधरी व गाटे या दोन गटातील कार्यकर्त्यांनी लोखंडी पाइप, तलवार, कोयता, काट्या व दगडाने एकमेकावर मारहाण केली. यात सहा जण गंभीर जखमी झाले. गाटे गटाच्या १४ जणांवर वैराग पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गाटे गटातील १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये बाळराजे गाटे, नानासाहेब गाटे, उत्तम गाटे, सागर गाटे, अशोक गाटे, केशव गाटे, सुरज गाटे, मारूती गाटे, बिभीषन गाटे, नागेश टोके, किशोर गाटे, अक्षय गाटे, विठ्ठल गाटे, प्रदीप भोसले असे गुन्हा दाखल असलेल्यांची नावे आहे. तर मारहाणीत रामेश्वर चौधरी, ज्ञानेश्‍वर चौधरी, सुधाकर जाधव, रोहन शिंदे, सुशांत भगत, परमेश्वर भगत यांना धारदार शस्त्राने मारहाण केल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

चौघांच्या किरकोळ भांडणातून मोठ्या भांडणात रूपांतर… वैराग पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सोरोळे येथील रोहन शिंदे व सुशांत भगत हे दोघेजण शेताकडे जात असताना, अनिकेत गाटे व अशोक गाटे यांच्या गाडीला कट लागला.. यावरून चौघांमध्ये किरकोळ स्वरूपाची भांडणे झाली.. याच भांडणाचा मनात राग धरून गाटे गटाच्या १४ जणांनी हत्याऱ्याच्या साह्याने वेताळ मंदिराजवळ रोहन शिंदे यास मारहाण करण्यास सुरुवात केली.

त्यावेळी भगत चौधरी यांच्यासह सहा जणांना तलवारी, काट्या, लोखंडी गज, ऊस तोडणी कोयता, दगड आणि लाथा बुक्यांनी मारहाण केली. तसेच शिवीगाळ करण्यात आली. दरम्यान या मारहाणीत झालेल्या झटापटीत खिशातील पैसे, मोबाईल, दुचाकी घेऊन गेले. या झालेल्या याप्रकरणी गुन्हा वैराग पोलिसात दाखल झाला असून घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र राठोड हे करत आहेत.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here