बार्शीत माय सिक्रेट डायरी चे प्रकाशन
इनरव्हील क्लब बार्शी आणि सोलापूर जिल्हा माहेश्वरी महिला संगठना यांचा उपक्रम
बार्शी: इनरव्हील क्लब बार्शी आणि सोलापूर जिल्हा माहेश्वरी महिला संगठना यांच्या संयुक्त विद्यमाने
“माय सिक्रेट डायरी ” चे पुस्तक प्रकाशित केले. अध्यक्ष स्थानी नगराध्यक्ष आसिफ तांबोळी हे होते.


यावेळी इनरव्हील क्लब च्या अध्यक्ष मंजू झंवर ,सोलापूर जिल्हा महेश्वरी महिला संघटनेच्या अध्यक्ष बसंती भराडिया , वक्ते प्रीतिका फायनान्सियल चे कृष्णकुमार सोमाणी यांच्यासह बार्शीतील सर्व संघटना चे अध्यक्ष आणि सचिव या कार्यक्रमास उपस्थित होते.
या पुस्तकाबद्दल इनरव्हील क्लब च्या सचिवा तथा प्रोजेक्ट प्रमुख सपना लाहोटी म्हणाल्या की
जर घरातील कर्ता व्यक्तीवर अचानक कठीण प्रसंग आला तर अडचणी चे वेळी कुटुंबातील इतर व्यक्ती ना काय करावे हे सुचत नाही. अश्या वेळी सगळ्यात जास्त अडचण येते ती आर्थिक बाबतीत. त्यासाठी जर प्रत्येक कुटुंबातील कर्ता व्यक्ती ने आपल्या कुटुंबाची संपूर्ण आर्थिक माहिती या पुस्तकामध्ये भरून ठेवलेली असेल तर अश्या कठीण प्रसंग मध्ये घरातील महिला साठी आर्थिक बाबी समजणे सोपे होते. व त्या सक्षम पणे आपल्या घराची आर्थिक बाजू ही सांभाळू शकतील हा या मागचा मुख्य उद्देश्य आहे. दोन्ही संघटना द्वारे ” माय सिक्रेट डायरी ” चा जास्तीत जास्त प्रचार प्रसार करून ती प्रत्येक कुटुंबाला मिळावी असे आवाहन सर्व संघटना ना करण्यात आले.
सूत्रसंचालन डॉ श्वेतल सोमाणी यांनी केले. आभार राजकमल हेडा यांनी मानले. या कार्यक्रमासाठी प्रमोदिनी कोठारी , उषा सोमाणी व आयएसओ ज्योती मुंदडा यांनी परिश्रम घेतले.