दिल्लीतील प्रजासत्ताकदिन संचलनात “एनसीसी कॅडेट्‌स’ची जबाबदारी बार्शीच्या प्रा. अरुषा शेटे-नंदिमठ यांच्यावर !

0
296

बार्शी : शहरातील श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालयाच्या प्राध्यापिका अरुषा शेटे- नंदिमठ या दिल्ली येथील राजपथावर प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या संचलनास 26 एनसीसी कॅडेट्‌सचे पथक घेऊन जाणार आहेत. या पथकाचे नेतृत्व कर्नल प्रशांत नायर करणार आहेत. 

याबाबत अधिक माहिती अशी की, दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनानिमित्ताने एनसीसी महाराष्ट्र कॉंटिजनचे पथक दरवर्षी दिल्ली राजपथावर संचलन करीत असते. महाराष्ट्रातून एनसीसीचे पुणे या ठिकाणी निवड चाचणी शिबिरातून निवडलेले 26 कॅडेट्‌सचे पथक 18 डिसेंबर 2020 रोजी विमानाने दिल्ली येथे जाणार आहे. या पथकास घेऊन जाण्याचा बहुमोल मान बार्शी येथील झाडबुके महाविद्यालयाचे एनसीसी कंपनी कमांडर मेजर प्रा. अरुषा शेटे- नंदिमठ यांना मिळाला आहे. त्यांच्यासोबत बारामतीचे विवेक बेले देखील असणार आहेत. 

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

देशभरातून आलेल्या एनसीसी पथकामधून महाराष्ट्र पथक दरवेळी प्रथम – द्वितीय क्रमांक पटकावत आले आहे. त्यामुळे या वेळी प्रथम क्रमांक पटकावण्याच्या उद्देशाने हे पथक सज्ज असल्याची माहिती पुणे ग्रुप कमांडर बिग्रेडिअर सुनील लिमये यांनी दिली. 

कोरानासारख्या महामारीत बार्शीसारख्या ग्रामीण भागातून प्रा. आरुषा शेटे यांची प्रजासत्ताक दिनी दिल्लीला संचलनासाठी निवड झाल्याने झाडबुके महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 

बार्शी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा प्रभाताई झाडबुके, संचालिका वर्षा ठोंबरे तसचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एस. पाटील यांनी याबाबत आनंद व्यक्‍त करत पथकाला शुभेच्छा दिल्या आहेत

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here