कारवाईसाठी गेलेल्या पोलिसाला लाकडी दांड्याने मारहाण,बार्शी तालुक्यातील प्रकार

0
508

कारवाईसाठी गेलेल्या पोलिसाला लाकडी दांड्याने मारहाण, भोईंजेतील आठ जनावर बार्शी तालुका पोलिसात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा

बार्शी ;

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

वाळु चोरांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचा-यास लाकडी दांड्याने मारहाण करून येथुन पुढे वाळु कारवाईला यायचे नाही असे म्हणून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा प्रकार बार्शी तालुक्यातील भोईजे येथील घोर ओढ्याजवळ घडला.प्रविण शहाणे असे जखमी पोलीस कर्मचा-याचे नाव आहे.याप्रकरणात आठ जनावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन सहा दुचाकी जप्त करण्यात आलेल्या आहेत.

कृष्णा उर्फ बबल्या कल्याण जाधव, सोमनाथ सत्यवान मुळे, विजय अर्जुन निकम , चेतन भिमराव नवले , अजित अर्जुन निकम ,अजित सुरवसे, भाऊ महादेव चव्हाण व अतुल धनाजी कवटे सर्व रा. भोईंजे ता. बार्शी याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्याची नावे आहेत.

$जखमी पो.क.प्रविण शहाणे नेम.बार्शी तालुका पोलीस ठाणे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की ते पोलीस ठाणेस असताना खांडवी बिट अंमलदार यांनी फोनद्वारे कळविले की, बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, भोईंजे ता. बार्शी येथील घोर ओढयात अवैध्य वाळु उपसा सुरू आहे. सदरबाबत सपोनि शिवाजी जायपत्रे यांना कळविले असुन सदर ठिकाणी छापा कारवाई करणे करीता शेंद्री फाटा येथे येण्यास सांगितले.

त्यावरून फिर्यादी हे मोटारसायकलवरून शेंद्री फाटा येथे आले व गाटे, धुमाळ असे भोईंजे ता. बार्शी येथील घोर ओढयाकडे दोन मोटारसायकलवरून जात असताना घोर ओढयाचे अलिकडे रस्त्याचे बाजुला शेतामध्ये काही इसम बसलेले दिसले. त्यांनी त्यांचे जवळ थांबुन आम्ही पोलीस असल्याचे सांगुन त्यांना येवढया उशिरा येथे थांबण्याचे कारण विचारले असता त्यांनी काहीएक समाधान कारक उत्तर दिले नाही. त्यामुळे आम्ही त्यांचे पासुन पुढे 500 मी अंतरावर असलेल्या घोर ओढयाकडे जात असताना त्यांचे पैकी एक इसम त्याचे अंगात विटकरी रंगाचा टी शर्ट घातलेला त्यांच्या जवळ आला व त्याने पोलिसांना तुम्ही पुढे ओढयाकडे जायचे नाही असे म्हणुन मोटारसायकल समोर आडवा उभारला.

फिर्यादीने मोटारसायकलवरून उतरून त्यास बाजुला करून आम्हास घोर ओढयात अवैध्य वाळु उपसा सुरू असल्याबाबत बातमी मिळाल्याने आम्ही तेथे कारवार्इसाठी जात असल्याचे सांगितले. तरी देखील सदर इसमाने त्यांचे इतर साथिदारांना बोलाविले. तेंव्हा सर्व पोलीस मोटारसायकलवरून खाली उतरलो असता अंगात विटकरी रंगाचा टी शर्ट घातलेल्या इसमाने तेथे पडलेल्या लाकडी दांडा उचलुन पोलीस कर्मचारी शहाने यांच्या पाठीवर मारला व येथुन पुढे वाळु कारवार्इला यायचे नाही असे म्हणुन मोठयाने आरडा ओरडा केला.

सोबत असलेले पोलीस कर्मचारी गाटे, व धुमाळ हे मदतीला आले असता सदर इसमासोबत असलेल्या इतर लोकांनी दोन्ही पोलिसांना पकडले. त्यावेळी सर्व लोक तेथुन ओढयाकडे पळुन जावु लागले. आम्ही पळुन जाणारे एका इसमास पकडले. पकडलेल्या इसमास त्याचा नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव सोमनाथ सत्यवान मुळे वय 24 वर्षे रा. भोईंजे ता. बार्शी असे असल्याचे सांगितले. त्यास विटकरी रंगाचा टी शर्ट घातलेल्या इसमाचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव कृष्णा उर्फ बबल्या कल्याण जाधव रा. भोईंजे असल्याचे सांगितले व पळुन गेलेल्या इसमांची त्याने नावे सांगितली.

विजय निकम यांचे शेतामध्ये जेवणाची पार्टी करण्यासाठी थांबलो असल्याचे सांगितले.बार्शी तालुका पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here