बार्शी : बार्शी शहर पोलिसांनी गुरुवार दि. ७ एप्रिल २०२२ रोजी दुपारी रस्त्यावर गाडा, बोर्ड, खुर्च्या आदी सामान ठेऊन रहदारीस अडथळा करुन ज्यूस, आईसक्रिम विक्री करणाऱ्या विक्रेत्यांविरुध्द कारवाई केली.

यामध्ये शहरातील मदिना मशीदीच्या खालील गाळ्यासमोर, १) किंग रसवंती गृह (नुरदानीश शब्बीर तांबोळी), २) रोशन आणि ट्रेडर्स (साजिद मुसा करमाळकर), ३) रजा ज्युस व स्पेशल लस्सी सेंटर (शकुर इस्माईल बागवान) ४) अदनान आईसस्क्रीम पार्लर व कोल्ड्रींक्स सेंटर (आदम हारुन पठाण) यांचेविरुध्द रहदारीस व वाहतूकीस अडथळा होईल अशा रितीने साहित्य ठेऊन विक्री केल्याबद्दल भा.द.वि.सं. कलम २८३ प्रमाणे गुन्हे दाखल केले आहेत.
आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा