करमाळ्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा 41 जण पोलिसांच्या ताब्यात

0
456

करमाळ्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा 41 जण पोलिसांच्या ताब्यात

करमाळा( प्रतिनिधी )सोलापूर पुणे अहमदनगर उस्मानाबाद या चार जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्‍या करमाळ्यातील संतोष जाधव यांच्या जुगारी क्लब अड्ड्यावर सोलापूर पोलिसांनी नियोजन पूर्वक धाड घालून 41 जुगार खेळणाऱ्यांना शिताफीने अटक केली. पोलिसांचीही तब्बल कारवाई तीन तास सुरू होती.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

याबाबत अधिक माहिती अशी की करमाळा कर्जत रोड वरील सुनील लूनिया प्लॉटिंग मधील जाधव यांच्या मालकीचे इमारतीत गेली तीन वर्षापासून जुगारी चा अड्डा चालत होता पन्नास रुपये पॉइंट नी खेळले जाणाऱ्या रमी वर रोज 15 ते 20 लाख रुपयांची उलाढाल होत असल्याची चर्चा होती. खाकी वर्दी शी अर्थपूर्ण संबंध असल्यामुळे या जुगारी चा क्लब कडे दुर्लक्ष केले जात होते अशी दबक्या आवाजात चर्चा होती चार जिल्ह्यातून गेमलर खेळण्यास येत असल्यामुळे मोठी आर्थिक उलाढाल आजूबाजूच्या परिसरात होत होती या जुगारी च्या क्लबच्या आजुबाजूला अर्धा किलोमीटर परिसरात कोणतीही वस्ती नाही या क्लब पासून एक किलोमीटर अंतरावर सर्व दृश्य त्याच्या रूम मध्ये दिसतील असे कॅमेरे बसविण्यात आले होते.

या अत्याधुनिक क्लबमध्ये जुगार खेळण्यास येणाऱ्याला जेवण मद्यपान मालिश या सर्व व्यवस्था जागेवर पुरवल्या जात होत्या येणाऱ्या जाणाऱ्यांची वाहनांची व्यवस्था केली जात होती. कोरोना लॉकडाऊन चा काळा सुद्धा या दोन मजली इमारतीत मोठा जुगार झाल्याची चर्चा आहे. या जुगार अड्डा बद्दल कोणीही तक्रार करण्यास धजावत नव्हते. क्लब वर धाड टाकण्यासाठी कोण येत आहे का याची पाहणी करण्यासाठी काही विशेष तरुणांची नेमणूक करण्यात आली होती.

आज मात्र सोलापूरच्या जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्विनी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूरच्या पोलिसांनी गुप्त पद्धतीने करमाळा येथील प्रवासी वाहतूक करणारी एक गाडी ताब्यात घेऊन थेट जुगार अड्डयावर धाड टाकली यावेळी तब्बल 41 जणांना पोलिसांनी अटक केली. यावेळी यांच्याकडे लाखो रुपयांचा रोख रक्कम असल्याची चर्चा आहे जवळपास या छाप्याच्या च्या वेळेस 30 ते 40 लाख रुपयांची रोख रक्कम तेथून लंपास केल्याची चर्चा आहे रंगेहात पकडलेले एक्केचाळीस आरोपींपैकी बहुतेक जुगारी पुणे उस्मानाबाद नगर जिल्ह्यातील आहेत.

धाड शुक्रवारी सायंकाळी चार ते पाच च्या दरम्यान पडली दरम्यान सगळा गुन्हा दाखल करून सगळी प्रक्रिया पार पाडण्यात पोलिसांना तब्बल आठ तासाचा अवधी लागला आता हा जुगाराचा अड्डा कायमस्वरूपी बंद होणार की पुन्हा गेले ओल्या मागल्या प्रमाणे हा धंदा सुरू राहणार अशी चर्चा सुरू आहे या जुगाराच्या अड्ड्यावर करमाळा शहरातील अनेक तरुणांची तरुणांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहेत व धंदा चालणारे करोडपती झाले आहेत यातूनच करमाळा शहरातील गुन्हेगारी प्रवृत्ती फोफावत असून या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी अशीच भूमिका घ्यावी अशी मागणी होत आहे आजच्या या धाडसी कारवाईबद्दल जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्विनी ताई सातपुते यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here