बार्शीत शेतातील जुगार अड्ड्यावर पोलीसांचा छापा, ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त ; सहा जणांवर गुन्हा
बार्शी प्रतिनिधी
उपळाई ठोंगे हद्दीत जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलीसांनी सहा जणांना ताब्यात घेवून ४१ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. संबंधितांविरोधात बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दि. २१ रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास ही कारवाई झाली. याप्रकरणी पोलीस अंमलदार विजय घोगरे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

खांडवी बीट हद्दीत सहायक फौजदार पी जे जाधव, पो कर्मचारी भांगे, बोंदर, धुमाळ हे गस्तीवर होते. त्यावेळी उपळाई ठों हद्दीत कॅनॉलचे कडेला गव्हाणे फार्मच्या पश्चिमेस १ किमी अंतरावर शेतात लिंबाचे झाडाखाली काही व्यक्ती जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती पोलीसांनी मिळाली. त्याप्रमाणे ते सदर ठिकाणी पोहोचले असता एक व्यक्ती तुरीचा पिकाचा फायदा घेवून पळून गेला.
त्यावेळी पोलीसांनी इतर लोकांना गराडा घालून पकडले. पोलीसांनी त्यांची नावे विचारली असता त्यांनी रोहित तानाजी बाशिंगे रा. कसबा पेठ, संकेश्वर उदयान बार्शी, मुकेश अंबऋषी भोरे रा. कसबा पेठ बार्शी, रमेश विश्वनाथ पवार रा.सुभाष नगर बार्शी, महेश चंद्रकांत पवार रा.एकविराई चौक बार्शी, लक्ष्मण खंडू वाघ रा. मंगळवार पेठ, बार्शी तकबीर हिदायत पठाण रा. अमन चौकाचे पाठीमागे बार्शी अशी सांगितली.
पळून गेलेल्या व्यक्तीचे नांव विचारले असता अमोल विलास गुरव रा. बारंगुळे प्लॉट, बार्शी असे असल्याचे समजले. संबंधितांकडे पोलीसांनी चौकशी केली असता सदर जुगार अड्डा महेश चंद्रकांत पवार व लक्ष्मण खंडू वाघ असे दोघेजण चालवत असल्याचे सांगण्यात आले. पोलीसांनी संबंधितांकडून १७ हजार ६८० रोख रक्कम व इतर मुद्देमाल असे ४१६८० रूपये जप्त केले.