बार्शी : सुभाषनगर येथील रोटरी क्लबच्या मागील बाजूस काही लोक मद्यपान करुन आरडाओरडा करत अश्लिल शिवीगाळ करुन गोंधळ घालत आहेत, असे तेथील नागरिकांनी सांगितल्यावरुन पोलिस उपनिरिक्षक शिरसाट व पो.कॉ. महेश माने तेथे गेले असता, रोहित बाळू शिंदे व वैभव जाधव (दोघेही रा. सुभाषनगर, बार्शी) हे दोघे लोकांना शिवीगाळ करत होते.

त्यांना गोंधळ का घालता असे विचारले असता, त्यांनी पोलिसांना दुरुत्तरे दिल्यामुळे त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी पोलिसांना धक्काबुक्की करुन ढकलून दिले.
आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

त्याचवेळी तेथे आलेल्या डायल ११२ चे पो.कॉ. खाडे, इंगोले व साठे यांनी रोहित शिंदे यांस ताब्यात घेतले. तर वैभव जाधव निसटून पळून गेला. दोघांवर भा.दं.वि. १८६० कलम ३५३, ३३२, ३४ नुसार शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.