बार्शी शहरात वाहतुकीस अडथळे करणाऱ्या दहा फेरीवाल्यांवर पोलिसांकडून गुन्हे दाखल
बार्शी प्रतिनिधी –
बार्शी शहरातच्या दुतर्फा रस्त्यावर हातगाडी लावून वाहतुकीला अडथळा केलेल्या तसेच दुकानातील सामान मांडून हातगाड्या उभे करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या शहरातील सुमारे दहा हातगाडीवाल्यांवर शहर बार्शी शहर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.


याबाबत विविध पोलीस अंमलदार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आनंद अशोक वायकर रा. बालाजी कॉलनी सोलापूर रोड यांच्यावर पदपथावर आपले साहित्य विक्रीस ठेवल्या बाबत, अमर मन्मथ घाणेगावकर रा. माऊली नगर कासारवाडी यांच्यावर स्टेशनरी साहित्याचा गाड्या रस्त्यावर उभा केलाबाबत युसुफ सादिक बागवान रा. नाळे प्लॉट सादिक हरून बागवान रा.मांगडे चाळ,अशपाक रफिक बागवान रा. मांगडे चाळ वाहिद महबूब चौधरी रा. नाळे प्लॉट,संजय पांडुरंग माने रा.सोलापूर रोड मुळे प्लॉट यांच्यावर रस्त्यावर फळगाडे उभे केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला.
तसेच लक्ष्मण दशरथ माने रा. सोलापूर रोड सावळे चाळ बार्शी यांच्यावर रस्त्यामध्ये इडली गाडी उभा केल्याबद्दल, हरी गुणवंत शिरसागर रा. पाटिल प्लॉट ,गणेश येडाप्पा राजगुरू रा. भवानी पेठ यांच्यावर किरकोळ सामानाचे विक्रीचे सामान रस्त्याच्या अडथळा करून गाडी उभा केल्याबद्दल बार्शी शहर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे.पोलिसांनी केलेल्या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले असून समाधान व्यक्त केले आहे.