बार्शी: बार्शी तालुका पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यामध्ये आरोपीस मदत करण्याकरिता पन्नास हजार रुपयाची लाच मागून चाळीस हजार रुपये स्वीकारणाऱ्या पोलीस हवालदारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी रंगेहात पकडले.

हर्षवर्धन हरिश्चंद्र वाघमोडे, पद- पोलीस हवालदार, ब.नं. ५५, नेमणूक बार्शी तालुका पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण जि. सोलापूर.असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतलेल्या पोलिसाचे नाव आहे.
यातील तक्रारदार व त्यांचे नातेवाईक यांचेवर बार्शी तालुका पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण येथे गुन्हा रजिष्टर नंबर १६०/ २०२३ भादवि कलम १४३, १४७, १४८ १४९, ३२४, ३२७, ५०४, ५०६ सह महाराष्ट्र पोलीस अधिनीयम १९५१ चे कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

सदर गुन्हयामध्ये तक्रारदार व त्यांचे नातेवाईक यांना अटक करुन तात्काळ जामीनावर सोडणे करिता व सदर गुन्हयामध्ये मदत करणेकरिता ५०,००० रुपये लाचेची मागणी करुन, तडजोडी अंती ४०,००० रुपये लाच रक्कम स्वीकारताना सापळा कारवाई मध्ये यातील वर नमुद अरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे.
सदरची कारवाई उमाकांत महाडिक, पोलीस निरीक्षक, लाप्रवि, सोलापूर, पोलीस अंगलदार पोना स्वागीराव जाधव, पोना अतुल घाडगे, पोकों राजू पवार व चालक रशिद शेख सर्व नेम लाप्रवि, सोलापूर यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.