माझी वसुंधरा अभियानांतर्गत बार्शीत वृक्षारोपण
बार्शी प्रतिनिधी –
महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा अभियानांतर्गत सन 20-21 करीता, बार्शी शहरातील नगरपरिषदेच्या शाळांमध्ये व आसपासच्या परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, त्याचा शुभारंभ सुभाष नगर भागातील पंडित जवाहरलाल नेहरू न.पा.शाळा क्र. १४ मध्ये करण्यात आला.


समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून, वृक्षप्रेमी आमदार राजाभाऊ राऊत यांच्या हस्ते या शाळेमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. बार्शी नगरपरिषदेच्या वतीने शहरातील नगर परिषदेच्या प्रत्येक शाळेस कमीत कमी १०० रोपांचे वृक्षारोपण व त्याचे संगोपन करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. हे वृक्षारोपण करण्यासाठी बार्शी नगर परिषदेकडून झाडांची रोपे देण्यात येणार आहेत.
र
याप्रसंगी नगराध्यक्ष ॲड.आसिफभाई तांबोळी, मुख्याधिकारी सौ.अमिता दगडे पाटील मॅडम, नगरसेवक बाळासाहेब लांडे, आजिनाथ गायकवाड, प्रशासन अधिकारी अनिल बनसोडे, संजय पाटील, वनविभागाचे शेळके, थोरात व नगरपालिका शाळांचे शिक्षक बंधू-भगिनीं उपस्थित होते.