पिंपरी चिंचवड: जुलै महिना ठरतोय घातक; 23 दिवसात वाढले तब्बल 11 हजार रुग्ण, 178 जणांचा मृत्यू

0
374

पिंपरी चिंचवड: जुलै महिना ठरतोय घातक; 23 दिवसात वाढले तब्बल 11 हजार रुग्ण, 178 जणांचा मृत्यू

ग्लोबल न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाची साखळी तुटण्यासाठी केलेल्या लॉकडाउनमध्ये तब्बल 6 हजार 472 रुग्णांची वाढ झाली आहे. या दहा दिवसातील आजपर्यंतची सर्वाधिक रुग्ण वाढ आहे. त्यामुळे लॉकडाउनमध्ये साखळी तुटण्याऐवजी घट्ट झाली आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

आता ‘अनलॉक’मध्ये कोरोनाची साखळी तोडण्याचे प्रशासनासमोर मोठे आव्हान असणार आहे. दरम्यान, शहरासाठी जुलै महिना धोकादायक ठरला आहे. या 23 दिवसात तब्बल 10 हजार 755 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 178 जणांचा मृत्यू झाला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात 10 मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. मार्च, एप्रिल, अर्धा मे महिना शहरातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात होती. 31 मार्चपर्यंत शहरात केवळ 12 रुग्ण होते. तर, एकाचाही मृत्यू झाला नव्हता.

एप्रिल अखेर 120 रुग्ण झाले तर, 5 जणांचा मृत्यू झाला होता. 22 मे पर्यंत शहरातील परिस्थिती आटोक्यात होती. 22 मे रोजी शहरात 265 रुग्ण होते.

पण, 22 मे रोजी रुग्णसंख्या कमी झाल्याचा दावा करत शहराला रेडझोनमधून वगळ्यात आले. तेव्हापासून रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. नऊ दिवसात तब्बल 257 रुग्णांची वाढ झाली.

मे अखेर शहरात 522 रुग्ण झाले. तर, 8 जणांचा मृत्यू झाला होता.

जूनअखेर शहरात 3029 रुग्ण होते. तर 77 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर जुलैच्या 23 दिवसात तब्बल 10 हजार 755 रुग्णांची वाढ झाली आहे. मृत्यूमध्ये प्रचंड वाढ झाली. 23 दिवसात तब्बल 178 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

आजपर्यंत शहरातील 255 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 67 अशा 322 जणांचा मृत्यू झाला आहे.

लॉकडाउनपूर्वी म्हणजेच 13 जुलैपर्यंत शहरातील रुग्णसंख्या 7,637 होती. त्यानंतर शहरातील कोरोनाची साखळी तुटण्यासाठी 14 ते 23 जुलैपर्यंत लागू केलेल्या लॉकडाउनमध्ये तब्बल 6 हजार 472 रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामध्ये फक्त शहरातील 6,148 तर महापालिका हद्दीबाहेरील 324 रुग्णांचा समावेश आहे.

दहा दिवसांच्या लॉकडाउनमध्ये वाढलेली रुग्णसंख्या !

शहरातील शहराबाहेरील एकूण
14 जुलै – 535 22, 557
15 जुलै – 432 17, 449
16 जुलै – 501 46, 547
17 जुलै – 686 29, 715
18 जुलै – 656 33, 689
19 जुलै – 592 37, 629
20 जुलै – 643 37, 680
21 जुलै – 540 23, 563
22 जुलै – 886 41, 927
23 जुलै – 677 39, 716
एकूण – 6,148 324 6,472

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here