फड बार्शीचा, पैलवान बार्शीचे, वस्ताद मात्र भूम-परांड्याचे ?
एच सुदर्शन
बार्शी मराठवाड्याचे प्रवेशद्वार, भगवंताची बार्शी, शैक्षणिक सुविधांची बार्शी. ही बार्शी सध्या गाजतेय ती येथील वैद्यकीय सुविधांसाठी, म्हणूनच बार्शीच्या शेजारील 6-7 तालुके कोव्हिड महामारीच्या काळात बार्शीवर अवलंबून आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रात प्रसिद्ध असलेली बार्शी राजकीय फडातही तितकीच प्रसिद्ध आहे. कोरोना काळात ही बार्शीच्या फडात येथील राजकीय मल्ल एकमेकांवर डाव टाकण्याचा सोसल तेवढा प्रयत्न सोशल मीडियावर करत आहेत.

सध्याच्या या महामारीत कोरोना रुग्णांसाठी उभारण्यात आलेल्या 1000 बेड क्षमतेच्या सेंटरचे उद्घाटन प्रसंगी बार्शीतील राजकीय डावपेचात न अडकता दोन्ही मल्लांचा वस्ताद आपणच असल्याचे भूम-परांड्याचा नेत्याने दाखवन्याचा प्रयन्त केला. बार्शीतील दोन राजकीय मल्ल व या वस्तादाची ही कहाणी समजून घेण्यासाठी आपल्याला जुने संदर्भ लक्षात घेतले पाहिजेत.

2016 साली भूम-परांड्याचे नेते विदर्भातून विधांपरिषदेवर निवडून गेले होते तेव्हा त्यांनी त्यावेळी त्यांच्याच पक्षात असलेल्या बार्शीतील मल्लाला नगरपालिकेत व इतर निवडणुकीत सहकार्य केले होते. वस्तादाच्या विधानपरिषद निवडीनंतर बार्शी येथे त्यांचा सत्कार ही केला होता. पण बदलत्या राजकीय परिस्थितीत त्या मल्लाने अचानक तालीमच बदलली.
त्या नंतर चिडलेल्या वस्तादनी त्याच मातीतील मुरलेला पैलवान आपल्या गळाला लावत स्वपक्षात प्रवेश घेऊन विधानसभेचा डाव टाकला होता. विधानसभा निवडणुकी नंतर राज्यात जे मनिध्यानी नव्हते ते झाले, इथल्या पैलवाना सकट वस्ताद ही घरी बसले होते.
मागील एक वर्षा पासून कोरोना महामारीचा काळ सुरू आहे. त्यातच महामारीची दुसरी लाट आल्याने वैद्यकीय सुविधा व जमेल ती मदत करण्यासाठी सर्वच पुढे आले आहेत. याचाच भाग म्हणून भूम-परांड्याचा नेत्याने बार्शीत हजार बेड चे कोव्हिडं सेंटर उभारले व त्याच्या उद्घाटनाला राज्यातील मोठे नेते बोलवले.