वाशी तालुक्यातील शेतात आकाशातून पडले अर्धवट जळालेले दगड

0
260

वाशी तालुक्यातील शेतात आकाशातून पडले अर्धवट जळालेले दगड; तहसीलदारांनी भूवैज्ञानिकांना दाखवल्यानंतर कळले, हे तर उल्का पिंड!

उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी गावाजवळ शुक्रवारी सकाळी ६.३० वाजता प्रभू निवृत्ती माळी यांच्या शेतात बांधाच्या गवतावर आकाशातून एक दगड पडला. तो अर्धवट जळालेल्या स्वरूपात होता. यामुळे दीड इंच खोल खड्डा पडला. हा प्रकार तहसीलदारांना कळवण्यात आला. त्यांनी वरिष्ठ भूवैज्ञानिकांना कळवले. हा पडलेला दगड अशनी (उल्का) असल्याचे भूवैज्ञानिकांनी स्पष्ट केले.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

शेतात तुंबलेले पाणी काढत असताना माळी यांना विचित्र आवाज ऐकायला आला. त्यांच्यापासून सहा-सात फुटावर असलेल्या बांधावरच एक दगड जोरात आदळला. तो सोनेरी गव्हाळ रंगाचा होता. तो दगड त्यांनी घरी नेला. मुलांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी तो दगड वाशी तहसीलला दिला.

अशी आहे अशनी

  • ७ इंच लांबी, सहा इंच रुंदी.
  • ३.५ इंचापेक्षा अधिक जाडी.
  • २ किलो ३८ ग्रॅम अशनीचे वजन
  • रंग सोनेरी गव्हाळ. विविध थर.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here