भाग-1 : आपला व्यवसाय यशस्वी कसा करावा? हा प्रश्न सतावत असेल तर हा लेख वाचायला हवा

0
329

ग्लोबल न्युज: कोरोनामुळे जगभरात जी भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे त्याबद्दल आपणास माहीत आहेच. याचा वाईट परीणाम हा बऱ्याच उद्योगधंद्यांवर, व्यवसायांवर झाला आहे. म्हणूनच आपला व्यवसाय यशस्वीरीत्या कसा चालवावा व एक यशस्वी उद्योजक म्हणून कसे नावारूपाला यावे हे सांगणार आहे.

एखाद्या यशस्वी व्यवसायाचा मालक होण्यासाठी कठोर परिश्रम आणि समर्पण आवश्यक असते, परंतु त्यासोबतच वैयक्तिक गुण आणि व्यवसाय पद्धतीदेखील तितकीच महत्त्वाची असते. उद्योग हे नेहमीच उद्योजकाने घेतलेल्या प्रत्येक निर्णयावर अवलंबून असतात. त्यावरूनच त्या उद्योगाची पुढील दिशा ठरत असते. या मार्गदर्शकतत्त्वांचे अनुसरण करून, आपण यशस्वी व्यवसाय किंवा आपला विद्यमान व्यवसाय परत मार्गावर येण्याची शक्यता वाढवू शकता.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

योग्य मानसिकता शोधा

आपल्याला जे माहीत आहे ते करा, म्हणजेच आपण असा एखादा व्यवसाय सुरू केला पाहिजे ज्याचा आपल्याला अनुभव आहे. तो अनुभव एकतर कामाचा किंवा वैयक्तिक छंद असू शकतो. जरी एखादी व्यवसायाची कल्पना अत्यधिक फायदेशीर वाटत असली तरीही थोडाफार का होईना पण अनुभव असल्याशिवाय तो व्यवसाय सुरू करू नका.

उदाहरणार्थ, समजा तुम्हाला कॉफी बनवण्याचा अनुभव आहे व तुम्ही खूप छान कॉफी बनवता आणि तुमच्या या कौशल्याला तुम्ही व्यवसायात रुपांतरीत करू इच्छिता, तर तुम्हाला या उद्योगाबद्दल चांगली माहिती असेल आणि केवळ आपले ज्ञान आणि अनुभव नाही तर आपल्याला या कामाबद्दल असलेली आवडदेखील आपला व्यवसाय यशस्वी करण्यात महत्त्वाचे ठरेल.

एका विशिष्ठ हेतूने सुरुवात करा

व्यवसायाचे आर्थिक फायदे उत्तम असतात, परंतु कोणताही यशस्वी उद्योजक पैशाच्या धोरणासह सुरुवात करत नाही. आपला व्यवसाय यशस्वी करण्यासाठी आपल्याकडे स्पष्ट हेतू आवश्यक आहे. जसे की रोजगार संधी तयार करून आपल्या समाजाची परतफेड करणे, तसेच देशाच्या प्रगतीमध्ये हातभार लावणे किंवा दैनंदिन जीवनात येणाऱ्या समस्या सोडवणे. याचा अर्थ असा नाही की आपण नफा मिळवू नये, पण जर तुम्ही तुमच्या व्यवसायाचा मुख्य हेतू पूर्ण करू शकलात तर आपोआपच व्यवसायात नफा मिळवून व्यवसाय यशस्वी करू शकाल.

उदाहरणासाठी, आपण आपल्या कॉफी शॉपमध्ये प्रत्येक ग्राहकाला छान कॉफी देत आहे. त्यामुळे आपल्या कॉफी शॉपमध्ये एखादा समुदाय तयार होईल जेथे लोक मित्रांना नातेवाइकांना भेटू शकतील आणि वेळ घालवू शकतील.

Facebook, Google, Apple अशा मोठ्या कंपन्या पैसे कमवायचे म्हणून नाही तर काहीतरी हेतू साध्य करण्यासाठी निर्माण केल्या गेल्या आणि आज आपण त्या किती यशस्वी हे आहात जाणताच.

आपला ग्राहक वर्ग समजून घ्या

सर्वात महत्वाचे म्हणजे सुरुवात करण्यापूर्वी आपण जो व्यवसाय सुरू करणार आहात त्याबद्दल पूर्ण माहिती जाणुन घ्या. आपण जो व्यवसाय सुरू करणार आहात त्यामध्ये असणारी स्पर्धा तसेच मार्केटमधील इतर कंपन्या याचाही खोलवर अभ्यास करावा. त्यात कोणत्या सेवा किंवा वस्तूंची मागणी जास्त आहे याचीही माहिती घ्यावी.

आपले उत्पादन किंवा सेवा याची खरी गरज कोणाला आहे, तसेच ते कोण विकत घेणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती गोळा करा. आपले उत्पादन किंवा सेवा कोण वापरणार आहे याचा सखोल अभ्यास करा आणि त्यानुसार त्यात योग्य ते बदल करा किंवा निर्माण करा. तसेच आपल्या या संभाव्य ग्राहक वर्गापर्यंत आपण कोणकोणत्या मार्गाने पोहोचू शकता याबाबत पूर्ण अभ्यास करा व त्यानुसार अनुकरण करा.

व्यवसायातला मार्गदर्शक शोधा

एक चांगला मार्गदर्शक म्हणजेच मेन्टॉर शोधणे हे तुमच्या व्यवसायासाठी अत्यंत फायद्याचे ठरू शकते. म्हणजेच अशी व्यक्ती जी आधीच स्वतःचा यशस्वी व्यवसाय चालवत आहे किंवा व्यवसायाबद्दल तिला खूप वर्षांचा अनुभव आहे. उदाहरण म्हणजे आपल्या कुटुंबातील सदस्य किंवा कौटुंबिक मित्र जे व्यवसायात यशस्वी झाले आहेत. अशा व्यक्तींचे ज्ञान थेट अनुभवातून आले असल्यामुळे आपल्या व्यवसायास त्याचा नक्की फायदा होईल.

उदाहरणार्थ, कॉफी शॉपच्या उदाहरणामध्ये एखादा दुसऱ्या कॉफी शॉपचा मालक हा तुमच्यासाठी चांगला मेन्टॉर ठरू शकतो.

– चंदन इंगुले
७२७६५८०१०१
(लेखक डिजिटल मार्केटर आहेत तसेच व्यवसाय सल्लागार व मार्गदर्शक आहेत.)

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here