पानगाव, वांगरवाडी-तावरवाडी ग्रामपंचायतीवर आमदार राजेंद्र राऊत गटाचे वर्चस्व
बार्शी प्रतिनिधी –
पानगांव ग्रामपंचायत व वांगरवाडी- तावरवाडी ग्रुप ग्रामपंचायत निवडणुकीचा (५ ऑगस्ट) रोजी निकाल लागला. या मध्ये पानगाव ग्रामपंचायत मध्ये १५ पैकी ११ जागा जिंकत तर वांगरवाडी- तावरवाडी ग्रामपंचायत मध्ये ७ पैकी ७ जागा जिंकत आमदार राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखाली राऊत गटाने वर्चस्व सिद्ध केले आहे. विरोधी सोपल गटाला मात्र पानगाव मध्ये ४ जागांवर तर वांगरवाडी मध्ये 0 जागांवर समाधान मानावे लागले.


पानगाव ग्रामपंचायत नवनिर्वाचित विजयी ११ उमेद्वारां मध्ये वॉर्ड क्र.१ शोभा माधव कापसे (४७३), रोहीणी पांडूरंग जमदाडे (४६२), वार्ड क्र. २ मधुन नंदकुमार दत्तात्रय काळे(४६४), अंकुश भगवान मोरे(४४६), सखुबाई शहाजी गुजले(४३५), वार्ड क्र.३ मधून दयानंद भाऊ गाडे(६६७), जयसिंगराव पांडूरंग देशमुख(५६८), विद्या तानाजी ढेरे(६३६),वार्ड क्र.५ मधुन सदानंद भाऊ गाडे(६२५), जयश्री अविनाश जाधव(५६३), पद्मजा प्रकाश कानगुडे(५७७), या ११ जनांचा समावेश आहे तर वांगरवाडी- तावरवाडी ग्रुप ग्रामपंचायत नवनिर्वाचित विजय उमेदवारांमध्ये अनंता जगताप शितल काळे वैशाली तुपे संगीता तुपे सोमनाथ इंगळे अलका शिंदे नंदा ठोंबरे विजयी या सात जणांचा समावेश आहे.
दोन्ही ग्रामपंचायत मधील विजयी उमेदवारांची उमेदवारांचे आमदार राजेंद्र राऊत, माजी पक्षनेते विजय राऊत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रणवीर राऊत, यांनी अभिनंदन करून भावी कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या..
सर्व विजयी ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रणवीर राऊत यांच्या हस्ते बाजार समिती बार्शी या ठिकाणी करण्यात आला . यावेळी ग्रामपंचायत विजयासाठी योगदान दिलेले आप्पा कानगुडे, भाऊ गाडे, बाबा कापसे, आप्पा गाडे, लक्ष्मण घोडके, आबा आवारे, दत्ता पाटील, विकास देशमुख, रवी देशमुख, नाना कानगुडे, मोहन काळे, गणेश काळे, भगवान घोलप ,रवी साळुंखे, फिरोज पठाण ,प्रमोद तुपे, नाईकवाडी, रशिद शेख, खंडू आडके आदी उपस्थित होते.