आमचा विध्यार्थी सहा महिन्यातच पास झाला – शरद पवार
सामनाचे कार्यकारी संपादक तथा खासदार संजय राऊतांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची अडीज तास मुलाखत घेतली ही मुलाखत तीन भागांमध्ये दाखवण्यात येणार आहे. या टीझरच्या दुसऱ्या मुलाखतीत आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरू नसल्याचे सांगतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मात्र, आपला चांगला विद्यार्थी मानले आहे.

या सहा महिन्याच्या परीक्षेत आमचा विद्यार्थी संपूर्ण पास झाला आहे, असं सांगत मुख्यमंत्री ठाकरे यांचे कौतुकही केले आहे. या मुलाखतीत पवारांनी उद्द्भव ठाकरेंना विद्यार्थी बोलल्यामुळें आता आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

या मुलाखतीत शरद पवारांनी महाविकास आघाडीच्या सरकारवर भाष्य केले आहे. त्यावर आता ही सहा महिन्यांची परीक्षा झालीय. परीक्षा पूर्ण झालीय असे वाटत नाही.

परीक्षेतला प्रॅक्टिकलचा भाग अजूनही बाकी आहे, असं सांगतानाच आता कोठे लेखी परीक्षा झाली आहे, पण त्या परफॉर्मन्सवरून तरी प्रॅक्टिकलमध्येसुद्धा हे सरकार यशस्वी होईल असा आता ट्रेंड दिसतोय असे सुद्धा पवारांनी बोलून दाखविले.