उस्मानाबाद जिल्ह्यात शनिवारी ही 265 रुग्णाची वाढ; ६ जणांचा मृत्यू उस्मानाबाद तालुका आघाडीवर

0
571

उस्मानाबाद जिल्ह्यात शनिवारी ही 265  रुग्णाची वाढ;  ६ जणांचा मृत्यू उस्मानाबाद तालुका आघाडीवर

उस्मानाबाद : जिल्ह्यात सुरु असेल कोरोनाचा कहर काही केल्या कमी होत नसल्याचे दिसत आहे. आज शनिवारी  जिल्ह्यात नव्या २३५  रुग्णाची भर पडली असून सर्वधिक १०२ रुग्ण उस्मानाबाद तालुक्यात सापडले आहेत.  तर दिवसभरात सहा  जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.  त्यामुळे आजपर्यंत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णाचा आकडा २३८  वर गेला आहे.शनिवारी झालेल्या  सहा मयतामध्ये उस्मानाबाद शहरातील एक, उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी व ढोकी येथील प्रत्येकी एक तर तुळजापूर शहरातील २  आणि वाशी तालुक्यातील कडकनाथ वाडी येथील एकाचा समावेश आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

जिल्ह्यात आज पॉझिटिव्ह आलेल्या २३५ रुग्णापैकी १४४ जण आरटीपीसीआरमधुन तर ८५ जणाची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. तसेच ६ जण इतर जिल्ह्यामध्ये बाधित झाले आहेत.  आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णामध्ये सर्वाधिक रुग्ण उस्मानाबाद तालुक्यातील असून उस्मानाबाद तालुक्यात १०२ जण बाधित झाले आहेत. तर तुळजापुर तालुक्यातील ३० जण बाधित झाले असुन  उमरगा ३२ , कळंब ४६, परंडा १०, लोहारा ०४, भुम ०३, वाशी मध्ये ०८ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.

———–
कोरोना अपडेट
एकुण रुग्णसंख्या- ८२७५
बरे झालेले रुग्ण- ५८९०
उपचार सूरु रुग्ण- २१४७
एकुण मृत्यु – २३८

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here