उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांची बदली, नवे जिल्हाधिकारी म्हणून कौस्तुभ दिवेगावकर
उस्मानाबाद – उस्मानाबादच्या लोकप्रिय जिल्हाधिकारी दीपा मुधोळ – मुंडे यांची बदली झाली आहे. लातूर महापालिकाच्या आयुक्त म्हणून यापुढे ते काम करतील. तर उस्मानाबादच्या जिल्हाधिकारीपदी कौस्तुभ दिवेगावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ – मुंडे जिल्ह्यात लोकप्रिय होत्या. त्यांनी जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत प्रभावीपणे काम केले. देशासह राज्यात कोरोना रुग्ण वाढत असताना त्यांनी केलेल्या प्रशासकीय उपाययोजनांमुळे उस्मानाबाद जिल्हा तब्बल ३७ दिवस ग्रीन झोन मध्ये होता.

जिल्हाधिकारी मुधोळ-मुंडे यांनी त्यांच्या कारकिर्दीत लोकांच्या सहभागातून करोना तपासणी प्रयोगशाळा उभारणीचे महत्वपूर्ण काम केले आहे.

उस्मानाबादचे नवे जिल्हाधिकारी आता कौस्तुभ दिवेगावकर काम करणार आहे. दिवेगावकर यापूर्वी पुण्याला भूजल सर्व्हेक्षण विकास यंत्रणेमध्ये संचालक म्हणून कार्यरत होते. उस्मानाबाद जिल्ह्यात वाढत चाललेला कोरोनाचा संसर्ग रोखण्याचे त्याच्यापुढे सर्वात मोठे आव्हान असेल.