बार्शी : दुचाकी वरून प्रवास करणा-या महिलेस गावापासुन पाचशे मिटर अंतरावर तिघांनी मिळून अडवुन रोख रक्कम, सोन्याचे दागिने व घड्याळ असा एक लाख रूपयांचा ऐवज जबरदस्तीने लुटल्याचा प्रकार बार्शी-येरमाळा रस्त्यावर पाथरी ता.बार्शी गावाजवळील पुलावर घडला.

विद्या विजय बनसोडे वय 35 रा.हडपसर,महंमदवाडी (पुणे) यांनी याबाबत बार्शी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की त्या आपल्या दुचाकी वरूण जात असताना पाथरी गावाच्या पुढे असलेल्या पुलावर अज्ञात तिन ईसमांनी त्यांची दुचाकी आडवुन चाकुचा धाक दाखवून त्यांच्या गळ्यातील दिड तोळा वजनाचे सोन्याचे गंठण,तिन ग्रॅम वजनाचे कर्णफुले,रोख रक्कम व हातामधील घड्याळ असा ऐवज जबरदस्तीने काढुन घेऊन लंपास केला.
याबाबत बार्शी तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी जायपत्रे हे करत आहेत.