जेष्ठ विधितज्ञ पी.एस. नरसिंहा सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाची बाजू मांडणार
मुंबई, १ जुलै : जेष्ठ विधितज्ञ पी.एस.नरसिंहा सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू मांडणार असल्याची माहिती ऍडव्होकेट विनोद पाटील यांनी दिली आहे. मराठा समाजाच्या वतीने विनोद पाटील न्यायालयीन लढा लढत आहेत, येत्या ७ तारखेला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असून विनोद पाटील यांनी त्यासाठी तयारी पूर्ण केली आहे.

पी.एस. नरसिंहा हे देशातील नामांकित विधितज्ञ असून त्यांनी मध्य प्रदेशमध्ये आरक्षणाची केस लढली होती तसेच देशातील बीसीसीआय’सारख्या इतर प्रमुख केसेसमध्ये बाजू मांडलेली आहे. ते देशाचे माजी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया होते.

तत्पूर्वी फेसबुकवर पोस्ट टाकत त्यांनी म्हटलं होतं की, ७ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची सुनावणी आहे. मात्र आरक्षण टिकवण्यासाठी राज्य सरकारच दुर्लक्ष आहे, कारण राज्य सरकारच्या वतीने दिल्ली येथे कोणत्याही ज्येष्ठ विधीतज्ञांशी संपर्क झालेला नाही.

याशिवाय महाराष्ट्राचे मुख्य सरकारी वकील हे ३ महिन्यापासून मुंबईमध्ये आहेत, त्यांनी एखाद्या दिग्गज वकीलाशी संपर्क साधला का? राज्य सरकारच्या वतीने कोणते ज्येष्ठ वकील आरक्षण टिकवण्यासाठी बाजू मांडतील? सुनीवणीची काय तयारी केली? सर्व सरकारी वकीलांना याेगय कागदपत्र पोहोच केलेत का? कधी मीटिंग घेणार? या बाबत तातडीने खुलासा करावा. समाजाच्या वतीने मी लढा देत आहे, मी माझ्या वतीने सर्व तयारी केली आहे. दिग्गज विधितज्ञ आपल्या बाजूने युक्तिवाद करतील. परंतु शासनाची सुद्धा जबाबदारी आहे हे विसरू नये. पांडुरंग आपल्या सोबतच आहे परंतु आरक्षणाच काही बर वाईट झाल तर सरकार जबाबदार राहील.