आता शासकीय सुट्ट्या दिवशीही बार्शी बाजार समितीतील कर्मचारी करणार काम
देशाच्या व बाजार समितीच्या अमृत महोत्सवा निमित्त कर्मचाऱ्यांचा आदर्शवत निर्णय
बार्शी : व्यक्ती अन क्षेत्र कोणतेही असो आपले काम जबाबदारीची जाणीव ठेवून करणे म्हणजेच खऱ्या अर्थाने देशसेवा करणे होय. या सूत्रानुसार बार्शी कृषि उत्पन्न बाजार समितीचे कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी देशाचे व बाजार समितीचे अमृत महोत्सवाचे औचित्य साधत बाजार समितीस असणाऱ्या शासकिय सुट्या, दुसरा शनिवार, चौथा शनिवार व महापुरुषांच्या जयंती निमित्त कार्यालय सुरु ठेवण्याचा निर्धार केला आहे. एवढेच नाही तर यानिमित्ताने दुप्पट काम करण्याचा मनोदय या कर्मचाऱ्यांनी बोलून दाखवला आहे.

कर्मचाऱ्यांच्या या निर्णयामुळे बाजार आवारामध्ये येणाऱ्या शेतकरी व बाजारसमितील घटक यांची सोय होणार आहे. देशासाठी अन्नधान्य पिकवणाऱ्या बळीराजाला कधीही सुट्टी नसते तसेच देशाचे रक्षण करणारे सिमेवरील जवान २४ तास कार्यरत असतात. बाजार
समिती ही संपूर्ण ही बळीराजाची आहे. बळीराजाची गैरसोय टाळण्यासाठी व शासनाचे अर्थिक नुकसान टाळण्यासाठी महापुरुषांच्या जयंती निमित्तचे सुट्टी दिवशी कार्यालय सुरु ठेवून जास्तीचे काम करुन खरी त्यांच्याप्रमाणे देशसेवा करण्याचा निर्णय सर्व कर्मचारी बांधवांनी घेतला आहे.ध्वजारोहण कार्यक्रम होताच या
निर्णयाचे निवेदन बाजार समितीचे सचिव तुकाराम जगदाळे व सर्व कार्यालयीन कर्मचारी यांनी बाजार समितीचे सभापती रणवीर राऊत व संचालक रावसाहेब मनगिरे यांना दिले.

कोट
देशाच्या स्वातंत्र्याचा व बाजार समितीचा यंदा अमृत महोत्सव यंदा आहे. त्यामुळे देशासाठी जास्तीचे काम करणे गरजेचे आहे. यासाठी सार्वजनीक सुट्यांचा वापर कामकाजात आणणे हीच खरी देश सेवा आहे.म्हणून आम्ही हा निर्णय घेतला.
तुकाराम जगदाळे सचिव बाजार समिती
कोट
ज्या ज्या महापुरुषांनी देश स्वातंत्र्य करण्यासाठी व देशाला सर्वोच्च शिखरावर पोहोचविण्यासाठी दिवस-रात्र अविरतपणे सेवा केली, त्या महापुरुषांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून, जास्तीत जास्त काम करून त्यांना खरी आदरांजली वाहण्याचा बार्शी बाजार समितीचे कर्मचाऱ्यांनी घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे. इतर शासकीय आणि निमशासकीय आस्थापनांनी असा निर्णय घ्यावा.
रणवीर राऊत, सभापती बाजार समिती