आता बास झालं, मुंबई पोलीस आमची शान – केदार शिंदे
अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणात राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनीच मुंबई पोलिसांवर विश्वास न ठेवता हे प्रकरण CBI कडे देण्याची मागणी केली होती. मात्र मुंबई पोलिसांवर सुरु असलेल्या आरोप-प्रत्यारोपावर आता खुद्द सिने दिग्दर्शक केदार शिंदे चांगलेच चवताळले आहेत.


“आता बास्स झालं मुंबई पोलीस तुम्ही आमची शान आहात. सतत तुमच्या विषयी नीगेटिव्ह बातम्या सुरू आहेत. कुणीही येतय आणि टिकली वाजवून जातय. तोंडावर त्यांना पुरावे देऊन या सुशनसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा समारोप करा!!!! तुमच्यावर आम्हाला गर्व आहे. असे ट्विट शिंदे यांनी केले आहे.
सुशांत सिंह राजपूतच्या जाण्याचं नक्कीच दु:ख आहे. त्याच्या प्रकरणाचा छडा लावाच! पण या काही दिवसांमध्ये हिंदी/इंग्रजी/मराठी वृत्तवाहिन्यांवर फक्त त्याच्यावरचे एपिसोड पाहून चिंता वाटतेय. लोकांना वेगळ्याच घटनेत गुंतवून देशासमोरचे महत्वाचे विषय बाजूला सारले जात आहेत. हे जाणीवपुर्वक चाललंय का?” असाही सवाल केदार शिंदे उपस्थित केला आहे.