आता पुन्हा मुंबईकरांचा मटणावर ताव, देवनार पशुवध गृह सुरू करण्याची परवानगी
सध्या कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी मागील तीन महिन्यापासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. मात्र मेच्या पहिल्या आठवड्यात लॉकडाऊन मध्ये शिथिलता देत महाराष्ट्र विशेषकरून मुंबई पुन्हा रुळावर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यातच आता मार्चच्या शेवटच्या आठवड्यपासून बंद असलेल्या देवनार पशुवध गृह पुन्हा सुरु करण्याची अनुमती देण्यात आलेली आहे.

मुंबई महापालिकेचे देवनार पशुवधगृह पुन्हा एकदा येत्या शुक्रवार म्हणजे तीन जुलैपासून पशुवधगृहात शेळ्या-मेंढ्या आणण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे मुंबईकरांना आता मटण सहज उपलब्ध होणार आहे. देवनार पशुवधगृहात दर दिवशी दोन पाळ्यांमध्ये शेळ्या-मेंढ्या, डुक्कर तसेच मोठी जनावरे यांची कत्तल केली जाते. एका पाळीमध्ये ३०० शेळ्या, ६ हजार बकरे, ३०० मेाठी जनावरे कापली जातात.

काय आहे नियमावली वाचा
१) २ जुलै पासून सुरु होणाऱ्या देवनार पशुवध गृहात प्रवेश करण्यापूर्वी प्रत्येक व्यापाऱ्याने शेळ्या-मेंढ्या अशी जनावरे विक्रीला आणण्यासाठी मुख्य निरीक्षकाकडून परवाना घेणे जिकरीचे आहे.
२) फक्त ४० वाहनानं प्रवेश दिला जाणार आहे.
३) परवाना मध्ये फक्त देवनार पशुवध गृहात जनावरे नेण्यासाठी पररवांगी असेल मात्र मुंबईत इतरत्र कोठेही जनावरे घेऊन जाता येणार नाही.
४) मास्क, सॅनिटायझरसह सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन कर्मचाऱ्यांकडून केले जाईल.
