रामजन्मभूमीच्या मुद्द्यावरून दूर राहण्याचा निरुपम यांचा काँग्रेस नेत्यांना सल्ला
रामजन्म भूमीच्या मुद्यावरुन राज्याचे राजकारणात तापलेले असताना त्यात आता काँग्रेसचे नेते, माजी खासदार संजय निरुपम यांनी उडी घेतली आहे. राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या वादापासून दूर राहण्याचा सल्ला काँग्रेसच्या नेत्यांना दिला आहे. तसेच काँग्रेस राम मंदिराच्या विरोधात नाहीये, याकडेही निरुपम यांनी काँग्रेसचे लक्ष वेधलं आहे.


यावर संजय निरुपम यांनी ट्विट करत भाष्य केले आहे. तसेच राष्ट्रवादीला चिमटा सुद्धा काढला आहे.
“राम मंदिराच्या भूमिपूजनावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विनाकारण प्रश्नचिन्हे निर्माण केली आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भूमिपूजन सोहळ्याला जाण्यासाठी कंबर कसली आहे.
त्यामुळे काँग्रेसने या वादापासून दूर राहिलेलं बरं. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच राम मंदिराचं निर्माण होत आहे. काँग्रेस मंदिर बनविण्याच्या विरोधात नाही” असे निरुपम यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे.