कोरोना संसर्गातही निलेश राणेंचा सेनेवर हल्ला….!
नारायण राणे यांचे सुपुत्र तथा माजी खासदार निलेश राणे यांनी काळ आपला कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती ट्विटरद्वारे दिली होती. मात्र रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला असताना सुद्धा राणे यांनी शिवसेनेवर टीका करणे सुरूच ठेवले आहे.


शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ‘सामना’तून रोखठोक मुलाखतीत मोदी सरकारवर हल्लाबोल केला होता. ‘तिकडे रशियाने कोरोनाची लस काढली. WHO लाही विचारले नाही. आम्ही मात्र आमच्याच मस्तीत आहोत,’ अशी टीका राऊत यांनी केली. राऊत यांच्या टीकेवर आता निलेश राऊत यांनी प्रतिउत्तर दिले आहे.
‘तू दिल्ली बिल्ली सोड आधी एक निवडणूक लढवून दाखव. मुंबई नाही सांभाळता येत…लागला देशाच्या वार्ता करायला, अशा एकेरी शब्दात निलेश राणे यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.