बार्शीच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या निहाल देसाईची प्रो कबड्डी लीग साठी निवड
बार्शी : येथील श्री शिवाजी शिक्षण मंडळाच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालय येथे एम.पी.एड. या पदव्युत्तर कोर्सचे शिक्षण घेत असणारा निहाल देसाई यांनी नुकत्याच हरियाणा येथे पार पडलेल्या 69 व्या वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेमध्ये गोवा राज्याचे प्रतिनिधित्व केले होते.या स्पर्धेत त्याने ब्रांझ पदक मिळवले होते.त्याचे कबड्डी खेळण्यातील कौशल्य व त्याच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत देशातील लोकप्रिय प्रो कबड्डी लीग साठी यूपी योद्धा या संघाने रुपये दहा लाख देऊन त्याची निवड केली आहे.


या विद्यार्थ्याने महाविद्यालयाच्या उज्वल परंपरेत भर घालण्याचे कार्य केले आहे.या गुणी खेळाडूच्या उल्लेखनीय कामगिरी व मिळवलेल्या यशाबद्दल श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ.बी.वाय.यादव उपाध्यक्ष श्री नंदन जगदाळे, जनरल सेक्रेटरी पी.टी.पाटील जॉइंट सेक्रेटरी अरुण देबडवार, खजिनदार श्री बापूसाहेब शितोळे यांनी अभिनंदन केले आहे.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. गोरे यांनी या गुणी खेळाडूचा सत्कार करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयातील सर्व विभागाचे विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेत कर्मचारी व विद्यार्थी या सत्कार कार्यक्रमास उपस्थित होते.