वैराग नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या निरंजन भूमकरांची एकहाती झेंडा-भाजप चार तर शिवसेना भोपळा

0
181

वैराग नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या निरंजन भूमकरांची एकहाती झेंडा-भाजप चार तर शिवसेना भोपळा

17 पैकी 13 जागा तर भाजपला चार जागा

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

बार्शी: तालुक्यात नव्याने स्थापन झालेल्या वैराग नगरपंचायतिच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये अपेक्षेप्रमाणे वैरागचे सुपुत्र निरंजन भूमकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवले आहे.17 पैकी 13 जागा राष्ट्रवादी काँग्रेसला,चार जागा भाजप(आमदार राजेंद्र राऊत) याना मिळाल्या. तर शिवसेनेचे दिलीप सोपल यांच्या गटाला खाते देखील उघडता आले नाही.

निवडणुक ही वैराग शहराची असली तरी चर्चा मात्र संपुर्ण तालुक्यात सुरु आहे. या निवडणुकीच्या निकालाचा परिणाम आगामी झेडपी,पंचायत समिती व बार्शी नगरपालिका निवडणुकीवर प्रत्यक्षपणे होणार असल्याने तालुक्यातील प्रमुख नेते आ. राजेंद्र राऊत व माजी आ. दिलीप सोपल व राष्ट्रवादी काँग्रेसचे निरंजन भूमकर हे विचारपुर्वक खेळ्या खेळत आहेत. शिवसेना व कॉंग्रेस शेवटच्या क्षणी एकत्र आले होते. तर राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप स्वबळावर लढले होते.

स्वतः निरंजन भूमकर आणि त्यांच्या पत्नी ही विजयी झाल्या आहेत.प्रभाग क्रमक 1 ते 7 ,9,10,12,13,14,15 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस तर 8,11,16 व 17 मध्ये भाजप विजयी झाले आहे. माजी आमदार चंद्रकांत निंबाळकर यांचे नातू शाहू निंबाळकर हे भाजपकडून विजयी झाले आहेत. तर त्यांचे पुतणे माजी जिल्हा परिषद सदस्य मकरंद निंबाळकर हे पराभूत झाले आहेत. एकही जागा न मिळाल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.

वैरागची निवडणुक असली तरी या निवडणुकीचा केंद्रबिंदू हा बार्शीच आहे़. राष्ट्रवादीचे निरंजन भूमकर सोडले तर भाजपा व शिवसेना या दोन्ही पक्षांची सुत्रे ही बार्शीकरांच्या ताब्यात होती.मात्र निकालानंतर खरा केंद्रबिंदू हा वैरागच होते हे सिद्ध झाले आहे.

बार्शीतील प्रसिध्द उद्योजक दिलीप गांधी यांना वैरागच्या आखाड्यात उतरवऊन आ राजेंद्र राऊत यांनी मोठी खेळी केली होती मात्र त्याना देखील पराभवाचा सामना करावा लागला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने माजी आमदार राजन पाटील,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष काका साठे व लोकनेते शुगरचे चेअरमन बाळराजे पाटील यांनी ही प्रचार करून बळ दिले होते.

विजयी उमेदवार खालीलप्रमाणे
अतुल मोहिते-राष्ट्रवादी काँग्रेस
निरंजन भूमकर-राष्ट्रवादी काँग्रेस
तृप्ती भूमकर -राष्ट्रवादी काँग्रेस
अनुप्रिया घोटकर-राष्ट्रवादी काँग्रेस
गुरुबाई झाडमुखे-राष्ट्रवादी काँग्रेस
आसमा मिर्झा-राष्ट्रवादी काँग्रेसचे
पद्मिनी सुरवसे-राष्ट्रवादी काँग्रेस
जैतूनबी बागवान -राष्ट्रवादी काँग्रेस
अक्षय ताटे-राष्ट्रवादी काँग्रेस
नागनाथ वाघ-राष्ट्रवादी काँग्रेस
श्रीशैल भलशंकर -भाजप
राणी आदमाणे-भाजपा
शाहू निंबाळकर -भाजप
सौ.माने रेड्डी -भाजप

साभार लोकमत

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here