राष्ट्रवादी काँग्रेस मोदींना पाठवणार २० लाख पत्रं ;भाजपाला प्रत्युत्तर
मुंबई – केंद्रातील सत्ताधारी भाजपा आणि राज्यातील सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता पत्र युद्ध रंगण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी राम मंदिराच्या भूमिपूजनावरून मोदी सरकारवर केलेल्या टीकेनंतर भाजपाने त्यांना जय श्री राम लिहून दहा लाख पत्रे पाठवण्याची घोषणा केली होती.

त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही भाजपाला प्रत्युत्तर देण्याची तयारी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी घोषणा लिहून राष्ट्रवादी काँग्रेस मोदींना व व्यकय्या नायडू २० लाख पत्रे पाठवणार आहे.

काल राज्यसभेमध्ये नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी झाला. या शपथविधीवेळी भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी शपथ पूर्ण झाल्यानंतर ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी…जय शिवाजी’ असा जयघोष करत शपथ पूर्ण केली होती . त्यावरून उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी त्यांना सभागृहात अशा घोषणा देऊ नये, अशी समज दिली होती.

दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिवप्रेमींकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशी घोषणा लिहून पंतप्रधान नरेंद्र मोदींना / व्यंकया नायडू२० लाख पत्रे पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी भाजपाच्याच खासदाराला ‘जय भवानी, जय शिवाजी’ घोषणा देण्यापासून रोखलं. यावरुन भाजपाच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काय भावना आहेत हे दिसून आलं. तसंच महाराष्ट्राबद्दल भाजपा नेत्यांच्या मनात किती द्वेष आहे आहे हे दिसतं. याचा निषेध म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं २० लाख पत्रं पाठवून भाजपचा निषेध केला जाणार असे मेहबूब शेख म्हणाले.
