बार्शी: राष्ट्रवादी काँग्रेस बार्शी तालुक्यात चांगलीच सक्रिय होऊ लागली आहे.देशाचे नेते खा.शरदचंद्र पवार यांच्या पुरोगामी विचारांवरती वाटचाल करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कट्टर व निष्ठावंत कार्यकर्ते तालुक्यातील बोरगाव झा चे कार्यकर्ते ऍड हर्षवर्धन बोधले यांची राष्ट्रवादी लिगल सेल बार्शी तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.


लीगल सेलचे जिल्हाध्यक्ष ऍड बाबासाहेब जाधव यांनी ही निवड केली आहे. तसेच तालुक्यात पक्ष बळकट करून नवीन तालुका कार्यकारिणी आपण लवकर जाहीर करावी असे म्हटलं आहे.ऍड बोधले यांना राजकीय वारसा असुन ते बाजार समितीचे माजी संचालक हरिश्चंद्र बोधले यांचे चिरंजीव आहेत. तसेच तालुक्यात त्यांची राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कट्टर समर्थक अशी ओळख आहे.त्यांच्या निवडीबद्दल माजी आमदार राजन पाटील,तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते निरंजन भूमकर, जिल्हा परिषद सदस्य बाळराजे पाटील यांनी अभिनंदन केले आहे.
