वैराग येथे तरुणाचा भरदिवसा धारदार हत्याराने खून; एक जण ताब्यात तीन जण फरार

0
266

वैराग येथे तरुणाचा भरदिवसा धारदार हत्याराने खून
वैराग – चोरीच्या सोन्यावरून चाललेली टोळीतील भांडणे सोडवून पुढे पोलीसांना सांगून टोळीचा भांडाफोड करतो असे म्हणाल्याचा राग मनात धरून तिघांनी वैराग येथे तरुणाचा भरदिवसा धारदार हत्याराने खून केला . यात सचिन उर्फ पप्पू पवार असे मयत झालेल्याचे नाव असून सदर घटना 2 एप्रिल शनिवारी दुपारी साडेचारच्या दरम्यान वैराग येथे सोलापूर रोडवर बालाजी फर्निचर शेजारी घडली आहे .

याप्रकरणी एकास ताब्यात घेतले असून उर्वरित तीन संशयित आरोपी फरार आहेत .सचिन उर्फ पप्पू महादेव पवार (रा .वैराग ता . बार्शी ) हा वैराग येथिल हरी केकडे व त्यांच्या टोळीमधील साथीदार जुबेर शेख,मिथुन साळवे,आणि अखिल यांची चोरीच्या सोन्यावरून चाललेली भांडणे सोडविण्यासाठी सोलापूर रोड वरील विठ्ठल कांबळे यांच्या चप्पल दुकानात गेला होता .

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

भांडण मिटल्या नंतर तुमच्या चोरीच्या सोन्याच्या टोळी बददल पोलीसांनी माहिती देतो असे पप्पू पवार म्हणाला . त्याचा राग मनात धरून हरी केकडे यांच्या सांगण्यावरून पप्पू पवार यास लाकडी ठोकळ्याने व धारधार हत्याराने जुबेर शेख,मिथुन साळवे,आणि अखिल यांनी मारहाण केली आणी ते मयताची मोटार सायकल घेऊन फरार झाले .

दरम्यान सदर घटनेची माहिती फिर्यादी मयताचा भाऊ सुरेश महादेव पवार यांना मिळताच ते आपल्या आईसह घटनास्थळी दाखल झाले . जखमी भावास उपचारासाठी बार्शी येथील जगदाळे मामा हॉस्पीटल मध्ये दाखल केले . तेथील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सोलापूर येथे अश्विनी हॉस्पिटल मध्ये त्याच्यावर उपचार सुरू असताना पप्पू पवार याचे 3 एप्रिल रोजी रविवारी सकाळी निधन झाले .

वैराग पोलीस ठाण्यात सुरेश महादेव पवार यांनी हरी केकडे,जुबेर शेख,मिथुन साळवे,अखिल यांच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे. त्यावरूण संशयीत चौघाजणा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here