मुंबईकरांनो सावधान जोरदार पाऊस पडण्याची शक्यता

0
375

मुंबईकरांनो सावधान जोरदार पाऊस पडण्याची शक्यता

ग्लोबल न्यूज; जून महिन्यात मुंबई शहरात गेल्या तीन वर्षाच्या तुलनेत कमी प्रमाणात पावसाची नोंद झालेली आहे. त्यामुळे यंदा वरून राजाची कृपादृष्टी मुंबईवर कमी झाली की काय असाच प्रश्न निर्माण होत होता. मात्र येणाऱ्या दोन दिवसात मुंबईतसह पालघर, ठाणे शहरात जोरदार पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

मुंबईत ३ आणि ४ जुलै रोजी मुसळधार पाऊस होईल, असे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे आणि पालघरमधील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळणार आहे.

कोकण भागात चांगला पाऊस पडत आहे. मात्र, पावसाची उघडीप आहे. शेतीच्या कामांना वेग आला आहे. दिवसा पासून कमी आणि रात्री पाऊस पडत असल्याचे दिसून येत आहे. आज सकाळपासून कोकणात पावसाला जोर दिसून येत आहे.

येत्या ४ जुलै ते २४ जुलै दरम्यानचे आठ दिवस समुद्र खवळेल्या दिसून येईल. या दिवशी समुद्राला मोठी भरती येणार आहे. या दिवसांत मुंबईच्या समुद्रात साडेचार मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा उसळणार आहेत.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here