सुशांत प्रकरणी साक्षिदारांना सुरक्ष देण्यास मुंबई पोलिसांचा नकार….!
सिनेअभिनेता सुशांत सिह राजपूत प्रकरणी साक्षीदारांना धाक आहे.. त्यांची हत्या होऊ शकते, असा अजब तर्क सुशांतचा भाऊ आणि भाजप आमदार नीरज सिंह याने लावला आहे


तसेच मुंबई पोलीस त्यांना सुरक्षा देण्यास नकार देत आहे, असा दावा केला. आमदार नीरज सिंह बबलू यांनी सुशांत प्रकरणातील साक्षीदारांना जीवे मारण्याची धमकी येत असल्याचाही दावा केला आहे.
भाजप पक्षाचे नेते तथा सुशांत सिह राजपूत यांचा भाऊ नीरज सिंह बबलू यांनी मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. मुंबई पोलीस साक्षीदारांना सुरक्षा देत नाही, असा दावा नीरज सिंह यांनी केला.
सुशांत प्रकरणातील साक्षीदारांच्या जीवाला धोका असून त्यांना तात्काळ पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. दुसरीकडे सुशांत सिंहच्या वडील आणि कुटुंबातील इतर सदस्य देखील या प्रकरणाची सातत्याने सीबीआय चौकशीची मागणी करत आहेत.