पत्रकार राजा माने यांना मातृशोक; अनुसया माने यांचे वृद्धापकाळाने निधन,आज तीन वाजता अंत्यसंस्कार

0
628

पत्रकार राजा माने यांना मातृशोक; अनुसया माने यांचे वृद्धापकाळाने निधन,आज तीन वाजता अंत्यसंस्कार

बार्शी: येथील ज्येष्ठ संपादक राजा माने यांच्या मातोश्री अनुसया उर्फ अक्का ज्ञानदेव माने यांचे वृद्धापकाळाने शुक्रवारी सकाळी निधन झाले. त्यांचे वय 89 वर्ष होते. आज दुपारी तीन वाजता मोक्षधाम मध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

सुभाष नगर रिंग रोड येथील प्रियदर्शनी अपार्टमेंट या राहत्या घरी सकाळी 7 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. अक्कानी अतिशय कष्ट घेत आपल्या तिन्ही मुलांना उच्च शिक्षित केले आहे. मागील दोन महिन्यापूर्वी त्यांचे पती ज्ञानदेव माने यांचे ही वृद्धापकाळाने निधन झाले होते. त्यामुळे माने कुटुंबावर दोन महिन्यात दुसरा आघात झाला आहे.अतिशय मनमिळाऊ स्वभावाच्या असलेल्या अक्काना विविध संस्थांचे आदर्श माता पुरस्कार मिळाले होते.

त्यांच्या पश्चात लोकमत चे माजी संपादक राजा माने, शिवशक्ती बँकेचे सरव्यवस्थापक एकनाथ माने, व भगवान माने ही तीन मुले,सुना, नातवंडे, परतवंडे असा परिवार आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here