भाजपाकडून शेतकऱ्यांची दिशाभूल, आमचे सरकार मागील चार महिन्यापासून दूध उत्पादकांना अनुदान देते
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील आणि भाजपाच्या नेत्यांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरु आहे. आघाडी सरकार मागील चार महिन्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा करत आहे असा दावा मंत्री बाळासाहेब थोरातांनी केला आहे. आज मुंबई येथे पत्रकार माध्यमांशी बोलताना त्यांनी हे आरोप भाजपावर लगावले आहे.


पुढे बोलताना त्यांनी भाजपावर सडकून टीका केली भाजपाला दुधाच्या दराबाबत आंदोलन करण्याचा कोणाही हक्क राहिलेला नाही. भाजपा सरकारच्या कार्यकाळात दूध अर्थव्यवस्था पूर्णपणे ढासळली होती. भाजपाने दूध भुकटी न्यूझीलंडमधून आयात केल्यामुळे दुधाचे भाव पडले होते. त्यामुळे आता भाजपाने या मुद्द्यावरुन आंदोलन करणे हास्यास्पद असल्याचे मंत्री थोरात यांनी बोलून दाखविले आहे.