गुजरात मध्ये मंत्र्याच्या मुलाची महिला पोलिसांबरोबर हुज्जत

0
352

गुजरात मध्ये मंत्र्याच्या मुलाची पोलिसांबरोबर हुज्जत

सध्या कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे सर्वत्र पुन्हा काही अटींमध्ये शिथिलता देत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र आता सुरक्षितेच्या दृष्टीने जाहीर करण्यात आलेला लॉकडाऊन मंत्र्यांचा मुलगाच पायदळी तुडवत असल्याचे दिसून आले आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

गुजरातमध्ये आरोग्य मंत्री किशोर कानाणी यांचा मुलगा प्रकाश कानाणी आणि त्याच्या सहा साथीदाराने नाकाबंदीवर ड्युटी करत असलेल्या महिला पोलीस कर्मचाबरोबर हुज्जत घातली. याप्रकरणी पोलिसांनी मंत्र्यांच्या मुलावर आणि साथीदारांवर कारवाही करत अटक केली होती.

रात्री संचारबंदीच्या दरम्यान आरोग्य मंत्र्यांचा मुलगा प्रकाशसह इतर मित्र विनामास्क फिरत होते. महिला पोलीस सुनीता यादवने त्यांना थांबवले. त्यामुळे प्रकाशने आपले वडील किशोर कानाणी यांना कॉल लाऊन महिला पोलिसाला बोलण्यास दिले. पण यानंतरही सुनीताने ऐकले नाही.

या प्रकरणात प्रकाशसह इतर सहजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणानंतर महिला पोलिसाची बदली करण्यात आली आहे. अशी चर्चा आहे. पण यावर एसीपी सीके पटेल यांनी म्हटले की, “महिला पोलीस काही दिवसांच्या सुट्टीवर गेली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.

ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सूरतचे पोलिस आयुक्त आरबी ब्रह्मभट्ट यांनी उपायुक्त स्तरावरील अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

या घटनेनंतर सुनिता यादव यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे या घटनेदरम्यान सुनीताने पोलिस निरीक्षक बी.एन.सागर यांना सांगितले की तिचे काम तिथे हिरा व कापड कारखाना चालू न देणे असे आहे असे तिने सांगितले. पॉईंटवर थांबत नाही. कोरोना साथीच्या आजारामुळे राज्यात सकाळी दहा ते पहाटे पाचपर्यंत कर्फ्यू लागू आहे आणि हेल्मेट न लावल्याबद्दल 200 रुपयांच्या दंडाची तरतूद आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here