सोलापूर जिल्ह्यात मिनी लॉकडाउन जाहीर ! 10 वी12 वी वगळता शाळा ही बंद राहणार

0
445

सोलापूर: जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी 10 वी आणि 12 वीचे वर्ग सोडून शहर आणि जिल्ह्यातील इतर सर्व शाळा 7 मार्च 2021 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. तसेच रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत संचारबंदी आदेश राहणार असून या काळात अत्यावश्यक सेवा सुरू राहतील, असेही पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

कोरोना प्रादुर्भावाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकाऱ्यांची आज नियोजन भवन येथे श्री. भरणे यांच्या अध्यक्षतेखाली व्यापक बैठक घेण्यात आली. सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकाऱ्यांची मते जाणून घेतल्यानंतर शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरूद्ध कांबळे, महापौर श्रीकांचना यन्नम, आमदार बबनराव शिंदे, सुभाष देशमुख, राजेंद्र राऊत, प्रणिती शिंदे, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, महापालिका आयुक्त पि. शिवशंकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे आदी उपस्थित होते

.

सोलापूरकरांनी कोरोना लढ्यात साथ दिल्याने कोरोनाचे संकट परतवून लावण्यास मदत झाली. पुन्हा कोरोनाचा नवा स्ट्रेन आलेला आहे. सोलापूर जिल्ह्यात रूग्ण वाढू लागले आहेत. आपल्याला पुन्हा लॉकडाऊन परवडणारा नाही, मात्र नागरिकांनी शासकीय आणि आरोग्य नियमाचे काटेकोर पालन करणे हिताचे आहे. काही कडक निर्बंध घालणे जरूरीचे आहे. सोलापूरकरांनी मास्कचा वापर, सॅनिटायझर आणि सुरक्षित अंतर ठेवल्यास कोरोनाला अटकाव करू शकतो. प्रत्येक नागरिकांनी आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी.

ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंटवर भर द्या

कोरोनाचा संभाव्य प्रसार रोखण्यासाठी आरटीपीसीआर चाचण्या वाढवा. ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंट या त्रिसूत्रीवर भर देऊन प्रभावीपणे राबवा. जे संसर्ग पसरवणारे आहेत त्यांच्याही चाचण्या करा. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर, डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलची तयारी करा. प्रत्येक ठिकाणी सुविधा देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here