कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्‍यक असलेल्या उपाययोजनेत हयगय; महापालिकेने केला डॉक्टरवर गुन्हा दाखल

0
432


सोलापूर : सोलापुरातील कलावती नगरमधील शिवशक्ती चौकातील बनशंकरी क्‍लिनिकमध्ये महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांच्यासह महापालिकेच्या इतर अधिकाऱ्यांनी आज अचानक भेट दिली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्‍यक असलेल्या उपाययोजना करण्याबाबत आयुक्तांनी काढलेल्या आदेशाचे उल्लंघन या ठिकाणी होत असल्याचे निदर्शनास आल्याने या रुग्णालयाच्या डॉक्‍टरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मानवी आरोग्याला धोका होईल, कोरोनाचा संसर्ग पसरण्याची हयगय केल्याचा ठपका ठेवत डॉ. शशिकांत चंद्रकांत खुजरगी यांच्याविरुद्ध कलम 188 सह आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या कलम 42(2) प्रमाणे फिर्याद दाखल करण्यात आली आहे. तसेच सोलापुरातील डॉ. मोनाली देशमुख, डॉ. नफिसा शेख, डॉ. अमोल देशमुख यांनाही नोटीस देण्यात आल्याची माहिती महापालिका उपायुक्त धनराज पांडे यांनी दिली. 

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

महापालिका रुग्णालय, शहरी नागरिक आरोग्य केंद्र, फिव्हर ओपीडी, नोंदणीकृत खासगी रुग्णालय व शासकीय रुग्णालय, डिस्पेन्सरी, ओपीडी, वैद्यकीय व्यावसायिक यांना तापसदृश अथवा आयएलआय रुग्ण आढळल्यास त्या रुग्णाला औषधोपचारासह महापालिकेच्या बॉईज प्रसूतिगृहाकडे, दाराशा प्रसूतिगृहाकडे, मजरेवाडी शहरी नागरिक आरोग्य केंद्र व मुद्रा सनसिटी या चार ठिकाणी कोरोना चाचणीचा स्वॅब घेण्यासाठी पाठवावे, अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत.

स्वॅब देण्याबाबतची शिफारस व स्वॅब घेतल्यानंतर डॉक्‍टरांनी याबाबतची माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांकडे व कंट्रोल रूमकडे ई-मेल आयडी व त्यांचा अहवाल पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच प्रपत्र 1 व प्रपत्र 2 नुसार माहितीही अद्ययावत ठेवणे आवश्‍यक आहे. सोलापूर शहरातील काही क्‍लिनिक या आदेशाचे उल्लंघन करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर महापालिकेने ही कारवाई केली आहे. बनशंकरी क्‍लिनिकमध्ये महापालिका आयुक्तांनी दिलेल्या भेटीप्रसंगी उपायुक्त अजयसिंग पवार, वैद्यकीय अधिकारी सतीश बोराडे हे देखील उपस्थित होते. 

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here