वैराग भागाच्या शिरपेचात मानाचा तुरा …. ! प्रा. आनंदराव काशीद यांच्या या मशिनला मिळाले भारत सरकारचे पेटंट

0
409

वैराग भागाच्या शिरपेचात मानाचा तुरा …. ! प्रा. आनंदराव काशीद यांच्या या मशिनला मिळाले भारत सरकारचे पेटंट

बार्शी: तालुक्यातील पिंपरी (सा ) गावचे सुपुत्र प्रा.आनंदराव शिवाजीराव काशीद यांना ” क्लॉथ डस्टर ” या मशीनच्या संशोधनाचे भारत सरकार चे पेटंट मिळाले आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

हे ” क्लॉथ डस्टर ” म्हणजे काय ? सोलापुरची देशभरात मिनी मॅन्चेस्टर म्हणून ओळख आहे .टॉवेल ,टर्कीश टॉवेल , सोलापुरी चादरी यांच मोठ्या प्रमाणावर उत्पादन सोलापुरात होत . नव्हे ” सोलापुरी चादर ही सोलापुरची ओळख आहे.

नवीन टॉवेल , नॅपकीन किंवा चादर तयार केल्यावर त्यावर सुताचे अगदी लहान तुकडे असतात . सध्या हे तुकडे झटकण्यासाठी बाल कामगार किंवा महिला कामाला असतात . ते झटकल्यानंतर हवेत ते तुकडे उडतात .परिणामी श्वास घेताना हे शरीरात जाऊन T.B. ( ट्युबर क्युलॅसिस ) होण्याचा धोका असतो .

आपण जेंव्हा जुनी गादी पिंजाऱ्याकडुन पिंजुन नवी करतो .. तेंव्हा हा अनुभव आपल्याला ५- १० वर्षानी येतो . पण टॉवेल कारखान्यातील . कामगारांना हे दररोजचे मरण .

हे प्रा.आनंदराव काशीद व त्यांचे सहकारी डॉ. बसगोंडा सोनगे यांच्या लक्षात आल आणि गेली अडीच ते तीन वर्ष दोघांनी यावर संशोधन केल आणि अतिशय कमी खर्चात या सुती तुकडे ओढुन घेणाऱ्या यंत्राचा शोध लावला . त्याच्या पेटंटची मागणी भारत सरकार च्या पेटंट विभागाकडे केली आणि ४ दिवसापुर्वी त्यांना सदर मशिनरीचे पेटंट मिळाल्याचे पत्र प्राप्त झाले. त्या साठी त्यांना आर्किड कॉलेज , सोलापुर व संस्थेने मदत व प्रोत्साहन दिले .

या यशाबद्द्ल वैराग सह तालुक्यातुन त्यांचे अभिनंदन होत आहे. ही बाब आम्हा वैरागकारांच्या दृष्टीने अभिमानास्पद असल्याचे वैराग तालुका विकास आघाडीचे प्रमुख किशोर देशमुख यांनी म्हटले आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here