मुंबई: महाराष्ट्रातील कोरोना संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालल्याने आता राज्य सरकारने ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत अनलॉक २.० ची घोषणा केली आहे. यावेळी महाराष्ट्र शासनाकडून ३१ जुलै २०२० पर्यंत लॉकडाऊनला मुदतवाढ दिली आहे. त्यानंतर आता राज्य सरकारने अनलॉक २.० साठीची नियमावली देखील जाहीर केली आहे. जाणून घ्या अनलॉक २ (Unlock 2.0) मध्ये काय सुरु राहणार आणि काय बंद राहणार.याबाबत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.

मास्क लावणं अनिवार्य आहे. विशेषत: सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी आणि प्रवासादरम्यान
सोशल डिस्टन्सिंग पाळणं गरजेचं. कोणत्याही ठिकाणी गर्दी करु नये. दुकानांमध्ये ५ पेक्षा अधिक ग्राहकांना प्रवेश दिला जाऊ नये.
कोणत्याही ठिकाणी गर्दी करण्यास मज्जाव, लग्न समारंभासाठी ५० जणांना परवानगी तर अंत्यविधीला देखील ५० जणांनाच उपस्थित राहता येणार.
सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास बंदी, आढळल्यास दंड आणि शिक्षा दोन्ही ठोठावण्यात येणार ,सार्वजनिक ठिकाणी दारु, पान, तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनास बंदी
वर्क फ्रॉम होमवर भर देण्यात यावा, जास्तीत कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम द्यावं.

सतत सॅनिटायझेशन करावं. कामाची ठिकाणी, इमारतीतील परिसर, जिथे माणसांचा वावर असेल अशी ठिकाणी सातत्याने सॅनिटाईज करावीत. सर्व अत्यावश्यक सेवा देणाऱी दुकाने पूर्वीप्रमाणेच सुरु राहतील. सर्व अनावश्यक दुकानांना राज्य शासनाने जारी केलेल्या सवलती व मार्गदर्शक सूचनांनुसार चालू ठेवण्यास परवानगी देण्यात येणार असून संबंधित महानगरपालिकेच्या धोरणानुसार ते चालू राहतील.

मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स वगळता सर्व अनावश्यक बाजारपेठा, बाजारपेठ आणि दुकाने सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत खुल्या राहतील. परवानगी असल्यासच दारु विक्री करता येणार (होम डिलिव्हरी किंवा दुकाने) अत्यावश्यक तसेच अनावश्यक वस्तू आणि सामग्रीसाठी ई-कॉमर्स सेवा सुरू राहील.
सध्या खुले असलेले सर्व औद्योगिक कारखाने कार्यरत राहतील. परवानगी असलेली सर्व बांधकामं (सार्वजनिक / खाजगी) खुल्या आणि कार्यरत राहतील. मान्सूनपूर्व कामे (सार्वजनिक / खाजगी) देखील चालू राहतील.
रेस्टॉरंट्स आणि हॉटेलमधील खाद्यपदार्थांच्या होम डिलीव्हरीला परवानगी.

वाहतूकसंबंधी: टॅक्सी / कॅब – १ + २, दुचाकी वाहन – केवळ एक स्वार, चारचाकी – १ + २, रिक्षा – १ + २
कंटेन्मेंट वगळता इतर भागात नियम शिथिल करण्यात आले आहेत.कंटेन्मेंट झोनमध्ये ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार कंटेन्मेंट झोन वगळता इतर ठिकाणी सरकारी कार्यालये सुरू होणार
१५ टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत शासकीय कार्यालय सुरू करण्याची मुभा , १० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत खासगी कार्यालय सुरू करण्याची मुभा ,चेहऱ्यावर मास्क लावणे आणि सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळणे अनिवार्य ,कंटेन्मेंट झोन जाहीर करण्याची परवानगी स्थानिक प्रशासनाला पार्किंगप्रमाणेच सम-विषम पद्धतीने दुकाने सुरू होणार
राज्यात मॉल्स, हॉटेल, धार्मिक स्धळे सुरू करण्यास तूर्तास परवानगी नाही, केंद्र सरकारने परवानगी दिली असली तरी राज्याने अद्याप दिली नाही.

पुढील सूचना येईपर्यंत शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्था सुरू होणार नाहीत ,वाहन दुरुस्ती करण्यासाठी पूर्वपरवानगीने गॅरेज सुरू करण्यासाठी परवानगी पेस्ट कंट्रोल, इलेक्टिशियन सारखी कामे सुरू ,जिल्ह्यात ५० टक्के प्रवाशांसह बस वाहतूकीला परवानगी ,सिनेमागृह, जीम, स्विमिंगपूल, थिएटर, बार, एंटरटेन्मेंट पार्कवर निर्बंध कायम .अत्यावश्यक सेवेसाठी चारचाकी गाडीत १+२ व्यक्तिंना प्रवासाची परवानगी