ग्लोबल न्यूज- राज्यात आज 5493 नवीन रुग्णांचे निदान झाले असून राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता 1 लाख 64 हजार 626 वर पोहोचली आहे. यापैकी 86 हजार 575 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तर 70 हजार 607 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

दिलासादायक बाब म्हणजे आज एकूण 2 हजार 330 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 52.59 टक्के एवढे आहे. राज्यात आज 156 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 60 मृत्यू मागील 48 तासातील आहेत. तर उर्वरित 96 मृत्यू मागील कालावधीतील आहेत.
या मृत्यूंमध्ये मुंबईतील 64, ठाणे 24, जळगाव 6, जालना 1 आणि अमरावतीमधील एका मृत्यूचा समावेश आहे.
राज्यात आत्तापर्यंत 9 लाख 23 हजार 502 जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली असून त्यातील 1 लाख 64 हजार 626 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.17.82 टक्के इतके हे प्रमाण आहे.
राज्यात सध्या 70 हजार 607 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात सध्या 5 लाख 70 हजार 475 लोक होम क्वॉरंटाइनमध्ये आहेत. तर 37 हजार 350 लोक संस्थात्मक क्वॉरंटाइनमध्ये आहेत.
दरम्यान, ठाणे जिल्ह्यात लॉकडाउन शिथिल केल्यानंतर काही भागात पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. विषाणू संसर्ग बाधीत रुग्णे वाढत असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढत आहे.
त्यामुळे ठाणे, नवी मुंबई, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर या महानगरपालिका क्षेत्रात कोरोना संसर्ग वाढणाऱ्या विभागात पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात येणार असल्याची घोषणा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
देशात व राज्यात अनलॉक प्रक्रिया सुरू झाली असली तरी नागरिकांनी काळजी घ्यावी. राज्यावर कोरोनाचे संकट हे दूर झाले नाही. आपल्याला कोरोनाविरोधात लढा द्यायचा आहे. पण कोरोनाला स्वत:हून बळी पडू नका’ असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना केले आहे.
राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील
मुंबई : बाधित रुग्ण- 75,539, बरे झालेले रुग्ण- 43,154, मृत्यू- 4371, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 8, ॲक्टिव्ह रुग्ण- 28,006
ठाणे : बाधित रुग्ण- 34,257, बरे झालेले रुग्ण- 14,335, मृत्यू- 845, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 1, ॲक्टिव्ह रुग्ण- 19,076
पालघर : बाधित रुग्ण- 5,267, बरे झालेले रुग्ण- 1,767, मृत्यू- 101, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 3399
रायगड : बाधित रुग्ण- 3,669, बरे झालेले रुग्ण- 1,924, मृत्यू- 95, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 2, ॲक्टिव्ह रुग्ण- 1,648
रत्नागिरी : बाधित रुग्ण- 569, बरे झालेले रुग्ण- 423, मृत्यू- 26, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 120
सिंधुदुर्ग : बाधित रुग्ण – 204, बरे झालेले रुग्ण- 151, मृत्यू- 4, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 49
पुणे : बाधित रुग्ण- 20,870, बरे झालेले रुग्ण- 10,708, मृत्यू- 714, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 9,448
सातारा : बाधित रुग्ण- 1,004, बरे झालेले रुग्ण- 703, मृत्यू- 43, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 1, ॲक्टिव्ह रुग्ण- 257
सांगली : बाधित रुग्ण- 347, बरे झालेले रुग्ण- 201, मृत्यू- 11, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 135
कोल्हापूर : बाधित रुग्ण- 824, बरे झालेले रुग्ण- 710, मृत्यू- 10, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 104
सोलापूर : बाधित रुग्ण- 2,588, बरे झालेले रुग्ण- 1,430, मृत्यू- 246, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 912
नाशिक : बाधित रुग्ण- 3902, बरे झालेले रुग्ण- 2,063, मृत्यू- 217, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 1,622
अहमदनगर : बाधित रुग्ण- 399, बरे झालेले रुग्ण- 249, मृत्यू- 14, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 136
जळगाव : बाधित रुग्ण- 3,002, बरे झालेले रुग्ण- 1,793, मृत्यू- 220, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 989

नंदूरबार : बाधित रुग्ण- 166, बरे झालेले रुग्ण- 70, मृत्यू- 7, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 89
धुळे : बाधित रुग्ण- 962, बरे झालेले रुग्ण- 449, मृत्यू- 54, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 2, ॲक्टिव्ह रुग्ण- 457
औरंगाबाद : बाधित रुग्ण- 4,833, बरे झालेले रुग्ण- 2,222, मृत्यू- 227, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 2,384
जालना : बाधित रुग्ण- 488, बरे झालेले रुग्ण- 313, मृत्यू- 14, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 161
बीड : बाधित रुग्ण- 112, बरे झालेले रुग्ण- 77, मृत्यू- 3, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0,ॲक्टिव्ह रुग्ण- 32
लातूर : बाधित रुग्ण- 303, बरे झालेले रुग्ण- 191, मृत्यू- 17, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 95
परभणी : बाधित रुग्ण- 92, बरे झालेले रुग्ण- 75, मृत्यू- 4, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 13
हिंगोली : बाधित रुग्ण- 262, बरे झालेले रुग्ण- 238, मृत्यू- 1, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 23
नांदेड : बाधित रुग्ण- 337, बरे झालेले रुग्ण 231, मृत्यू- 13, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 93
उस्मानाबाद : बाधित रुग्ण- 203, बरे झालेले रुग्ण- 161, मृत्यू- 9, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 33
अमरावती : बाधित रुग्ण- 528, बरे झालेले रुग्ण- 368, मृत्यू- 25, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण-135
अकोला : बाधित रुग्ण- 1,463, बरे झालेले रुग्ण- 869, मृत्यू- 73, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 1, ॲक्टिव्ह रुग्ण- 520
वाशिम : बाधित रुग्ण- 101, बरे झालेले रुग्ण- 61, मृत्यू- 3, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 37
बुलढाणा : बाधित रुग्ण- 213, बरे झालेले रुग्ण- 140, मृत्यू- 12, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 61
यवतमाळ : बाधित रुग्ण- 283, बरे झालेले रुग्ण- 186, मृत्यू- 10, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 87
नागपूर : बाधित रुग्ण- 1,421, बरे झालेले रुग्ण- 1,037, मृत्यू- 14, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 370
वर्धा : बाधित रुग्ण- 16, बरे झालेले रुग्ण- 11, मृत्यू- 1, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-0 , ॲक्टिव्ह रुग्ण- 4
भंडारा : बाधित रुग्ण- (७९), बरे झालेले रुग्ण- (५८), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२१)
गोंदिया : बाधित रुग्ण- 105, बरे झालेले रुग्ण- 102, मृत्यू- 1, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 2
चंद्रपूर : बाधित रुग्ण- 80, बरे झालेले रुग्ण- 54, मृत्यू- 0, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 26
गडचिरोली : बाधित रुग्ण- 64, बरे झालेले रुग्ण- 51, मृत्यू- 1, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 12
इतर राज्ये : बाधित रुग्ण- 74, बरे झालेले रुग्ण- 0, मृत्यू- 23, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 51
एकूण: बाधित रुग्ण-1,64,626, बरे झालेले रुग्ण- 86,575, मृत्यू- 7,429, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 15,ॲक्टिव्ह रुग्ण- 70,607