बार्शीच्या राजाभाऊ देशमुख यांचा अनोखा प्रयोग, आखाती देशातील खजूर पिकांमधून दोन एकरात साडेचार लाखांचे यशस्वी उत्पन्न
विक्रीसाठी बाजारपेठ शोधण्याची ही गरज नाही ,शेता शेजारीच होते विक्री

ओंकार हिंगमीरे
बार्शी: शेती असो की उद्योग त्यामध्ये सातत्याने नवीन तंत्रज्ञान किंवा बदल आत्मसात केले तर माणूस यशस्वी होऊ शकतो़ बार्शी शहरातील प्रगतशिल बागायतदार राजाभाऊ देशमुख हे असेच एक सतत प्रयोगकरणारे शेतकरी.
त्यांनी आखाती देशात उष्ण वातावरणात अत्यंत कमी पावसाच्या प्रदेशातील पिक असलेल्या खजूराची लागवड करुन त्यात भरघोस उत्पन्न मिळवले. देशमुख यांनी दोन एकर खजूराच्या शेतीतून साडेचार लाख रुपयाचे उत्पन्न काढले आहे़ विषेश म्हणजे खजूर विक्रीसाठी त्यांना बाजारपेठ शोधण्याची देखील गरज पडली नाही.

राजाभाऊ देशमुख यांनी बार्शी सोलापूर रोडवर अगदी बार्शीच्या लगत २४ एकर शेती आहे़ त्यामध्येत्यांनी सिताफळ, द्राक्ष, खजूर, गोड चिंच, ड्रॅगनफुड आदी फळपिकांची लागवड केली आहे़ २००८-०९ साली
३० बाय ५ फुट अंतरावर देशी लाल व पिवळ्या रंगांच्या खारीक शेतीची लागवड केली.

विषेश म्हणजे त्यांनी बियांपासून रोपे तयार केली़ लागवड करताना आगस्ट महिन्यात आठशे झाडांची लागवड केली.त्यामध्ये नर-मादी वेगळे करुन २०० झाडे सध्या ठेवली आहेत.चौथ्या वर्षी या झाडांना फळ लागण्यास सुरुवात झाल.त्यावेळी नर कोणता व मादी कोणती हे लक्षात आले़ व नरांची संख्या कमी केली.

या पिकाला जानेवारी ते मे या महिन्यात पाणी लागते.त्याला ही ठिबक सिंचनद्वारे पाणी दिले जाते़ या झाडांना औषधांची फवारणी करावी लागत नाही. झाडांचे काटे काढणे आणि नर-मादी पॉलीनेशनकरणे, घड वजन आल्यावर बांधणे, तसेच पावसापासून सरक्षण होण्यासाठी घडाला प्लॅस्टिीकचे आच्छादन बांधणे ही कामे करावी लागतात.


साधारण पावसाळ्याची सुरुवात होण्याच्या वेळेस म्हणजे जून-जुलैमध्ये या पिकाची काढणी सुरु होते.
एका झाडाला विस किलो पासून शंभर किलो पर्यंत माला निघतो.तसेच एका झाडाला दोन ते दहा घडलागतात.

यासाठी दरवर्षी एकरी ५० ते साठ हजार रुपये खर्च येतो़ या खजूराच्या विक्रीमधून दोन एकरात साडेचार लाख रुपयाचे उत्पन्न मिळते. शंभर रुपयापासून ते दिडशे रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे.

बाजारपेठ ही जाग्यावरच
राजाभाऊ देशमुख यांच्या सोबत त्यांचे बंधून अनिल, रविंद्र, विलास व पुतण्या विशाल देशमुख हे देखील त्यांना शेतीसाठी मदत करतात. विशेष म्हणजे देशमुख यांना ही खारीक विकण्यासाठी कोणत्याही बाजारात जाण्याची गरज पडत नाही.

बार्शी सोलापूर व बार्शी तुळजापूर रस्त्यावर शेताच्या जवळच ते विक्रीचा स्टॉल लावतात.यामध्ये दररोज साधावर पंचेविस ते तीस हजार रुपयाच्या खारीकची विक्री होती.जर एखाद्या वेळेस माल जास्त काढणीस आला तर पुण्याच्या बाजारात विक्रीसाठी पाठवला जातो.

यंदा देखील हा सर्व माल याठिकाणी विक्री केला.
तालुका कृषी अधिकारी शहाजी कदम यांच्या हस्ते या शेतकरी ते ग्राहक ते शेतकरी या संकल्पनेला देशमुख यांनी खऱ्या अर्थाने मूर्त स्वरूप दिले.

राजाभाऊ देशमुख-7020205028