राजाभाऊ पैकेकर यांना LIC चा MDRT 2022 सन्मान
बार्शी: भारतीय आयुर्विमा महामंडळाचे (एलआयसी ) च्या वतीने देण्यात येणारा सर्वोच्च सन्मानापैकी एक असणारा MDRT अमेरिका USA हा सन्मान तालुक्यातील गौडगाव che रहिवासी असणारे युवा उद्योजक राजाभाऊ पैकेकर यांना जाहीर झाला आहे.

एलआयसी मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांची निवड अमेरिकेमध्ये होणाऱ्या सेमिनार साठी झाली आहे. त्याबद्दल एलआयसी च्या अहमदनगर शाखेचे चे वरिष्ठ शाखा अधिकारी निरंजन महाबळ व विकास अधिकारी राजेंद्र पैकेकर यांच्या हस्ते MDRT ट्रॉफी पुष्पहार,गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

राजाभाऊ पैकेकर हे गेली बारा वर्ष विमा सेवा याक्षेत्रात कार्यरत असून यापूर्वी शतकवीर असे वेगवेगळे सन्मान यापूर्वी मिळवलेले आहेत. आपल्या विमाधारकांना उत्तम सेवा देत आहेत अशी माहिती महाबळ यांनी दिली.

याप्रसंगी राजाभाऊ पैकेकर यांनी एलआयसी मधील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे आभार मानले तसेच माझा गौरव हा माझ्या विमाधारकांचा व मित्रांचा, हितचिंतकांचा देखील आहे असे नमूद केले. यापुढेही जास्तीत जास्त विमाधारकांना उत्तम दर्जाची सेवा देऊन प्रश्न सोडविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.
