शुभाशुभ… 13. नंतर चांगला दिवस.
आज विशेष… सामान्य दिवस.
राहूकाळ… दुपारी 01.30 ते 03.00
दिशा शूल…दक्षिणेस असेल.
नक्षत्र… उत्तरा भाद्रपदा.
आजची चंद्र राशी… मीन.

आजचे राशीभविष्य
मेष – (शुभ रंग – केशरी)
आजचा दिवस धावपळीत जाईल. काही अनावश्यक खर्च होईल. काही जणांना आज दूरचे प्रवास होऊ शकतील. रात्रीचा प्रवास असेल तर झोपू नका, सतर्क रहा.
वृषभ – (शुभ रंग – मरून)
कार्यक्षेत्रात पूर्वीच्या श्रमांची फळे दृष्टिक्षेपात येतील. तुमच्या विरोधकांनाही तुमची मते पटू लागल्याचे तुमच्या लक्षात येईल. आज स्वप्नपूर्ती होणार आहे
मिथुन – (शुभ रंग – पांढरा)
वेळेचे योग्य नियोजन केल्याने दैनंदिन कामे आज सुरळीत पार पडतील. आपल्या अधिकारांचा योग्य प्रकारे वापर करून कार्यक्षेत्रात वर्चस्व प्रस्थापित करू शकाल.
कर्क – (शुभ रंग – पिस्ता)
आज क्षुल्लक कामातही अडचणींचे डोंगर उभे राहतील. शासकीय कामे खोळंबतील. आज नास्तिक मंडळीही देवाला एखादा नवस बोलतील. गृहिणी दानधर्म करतील
सिंह – (शुभ रंग – मोरपंखी)
नवीन व्यावसायिक असाल तर आज मर्यादेबाहेर आर्थिक धाडस करू नका. कामगार वर्गाने आपल्या सुरक्षिततेस प्राधान्य देणे गरजेचे आहे. ड्रायव्हिंग करताना जरा जपून.
कन्या – (शुभ रंग – गुलाबी)
कार्यक्षेत्रात स्पर्धेचा सामना करावाच लागणार आहे. आज तुम्हाला अडचणीच्या प्रसंगी जोडीदाराची खंबीर साथ असेल. वाणीत गोडवा असेल तर बरीच अवघड कामे सोपी होतील.

तूळ – (शुभ रंग – राखाडी)
धंद्यातील जुनी येणी वसूल झाल्याने व्यापाऱ्यांचा उत्साह वाढेल. महत्त्वाकांक्षेच्या मागे धावताना प्रकृतीकडे दुर्लक्ष होतंय. जुने आजार डोके वर काढण्याची शक्यता आहे काळजी घ्या.
वृश्चिक – (शुभ रंग – आकाशी)
मोठ्या लोकांमधील तुमची ऊठबस फायदेशीर राहील. उच्च राहणी व उच्च विचारसरणी असे तुमचे धोरण राहील. प्रेम प्रकरणांना थोरांकडून ग्रीन सिग्नल मिळू शकतो.
धनु – (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
कष्टांचाही अतिरेक करू नका. आज हार्डवर्क पेक्षा स्मार्टवर्क करणे हिताचे राहील. हातचे सोडून पळत्यामागे धावायचा मोह होईल पण तो टाळा. आज मातोश्रींचे मन मोडू नका.
मकर – (शुभ रंग – निळा)
काही जणांना घर दुरुस्तीची किरकोळ कामे हाती घ्यावी लागणार आहेत. आज मुर्खांशी वादाचे प्रसंग येतील, शांत राहणे हिताचे. मुले आज अभ्यास सोडून सर्व काही करतील.
कुंभ – (शुभ रंग – डाळिंबी)
पुष्कळ दिवसांनी आज घरात प्रिय पाहुण्यांचे आगमन होण्याची शक्यता आहे. आज तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या चर्चेत आपल्याच मुद्द्यावर अडून रहाल. उपवरांचे विवाहयोग जुळून येतील.
मीन – (शुभ रंग – मोतिया)
एखादी क्षुल्लक गोष्ट फारच मनाला लावून घ्याल. तुमची तब्येत थोडी नारमच राहील. विरोधक तुमच्या चुका काढण्याचा प्रयत्न करतील. मानसिक संतुलन ढळू देऊ नका.
!! शुभं भवतु!!
– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)