लातूर – टेंभुर्णी रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम तात्काळ हाती घ्यावे-खासदार ओमराजेंची गडकरींकडे मागणी

0
197

लातूर – टेंभुर्णी रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम तात्काळ हाती घ्यावे-खासदार ओमराजेंची गडकरींकडे मागणी

उस्मानाबाद: केंद्रीय रस्ते वाहतूक परिवहन विकास मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्र राज्यातील सर्व राष्ट्रीय महामार्गाचा आढावा घेणे बाबत राज्यातील सर्व खासदाराच्या समवेत बैठक आयोजित केली होती या बैठकीस खासदार ओमप्रकाश राजेनिंबाकर उपस्थित राहून धाराशिव लोकसभा मतदारसंघातील सर्व महामार्ग व त्याची सद्यस्थिती गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिली व करावयाच्या उपाययोजनेबाबत सूचना केल्या.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

उमरगा ते सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्र.65 हा अनेक वर्षांपासून अपूर्ण आहे त्यावर अनेक कामे प्रलंबित असून दिवसेंदिवस अपघात होऊन नागरिक मृत्यू होतात त्या रस्त्यांवरील उड्डाणपूल आणि ड्रेनेजच्या अपूर्ण कामांमुळे महामार्गावरील प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.त्यामुळे हा महामार्ग तात्काळ पूर्ण करावा याकरिता आपल्या स्तरावरून निर्देश देऊन कामाला सुरुवात करण्याबाबत विनंती केली.

महामार्ग क्र. 63 व राष्ट्रीय महामार्ग 548 C वरील लातूर ते टेंभुर्णी रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम तात्काळ हाती घ्यावे. मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड आणि बीड जिल्ह्यांसह विदर्भातील काही जिल्ह्यांचा पुणे आणि मुंबईला संपर्क होण्यासाठी हा महामार्ग अत्यंत महत्त्वपूर्ण आणि फायद्याचा असून सदर काम अद्याप अपूर्ण असल्यामुळे लातूर वरून टेंभुर्णी पर्यंत जाण्यासाठी तीन ते चार तासाचा वेळ लागतोय. हे चौपदरीकरणाचे काम झाल्यास प्रवाशांचा पैसा आणि वेळही वाचणार असून सदर काम लवकर पूर्ण करण्यासाठी संबंधितांना निर्देश देण्याबाबत विनंती केली.

राष्ट्रीय महामार्ग क्र. 361 मध्ये तुळजापूर ते औसा दरम्यान काक्रंबा येथील अंडरग्राऊंड ब्रिज आणि काक्रंबा चौक ते नळदुर्ग रोड बायपास काम पूर्ण करणे,आशिव येथील प्रलंबीत स्ट्रेट लाईट च्या कामाबाबत आपल्या स्तरावरून संबंधितांना तात्काळ निर्देश द्यावे.अशी विनंती केली

राष्ट्रीय महामार्ग 211 मध्ये धाराशिव शहराजवळील सर्व्हिस रोड, धाराशिव पोदार स्कूल ते उपळा येथील अंडरग्राऊंड उड्डाण पूल व उड्डाण पुलावरील स्ट्रीट लाईट इत्यादी कामे मंजूर करून सुरुवात करण्याबाबत विनंती केली.

धाराशिव जिल्ह्यातील तेर – उस्मानाबाद – वैराग – अनगर – रोपाळे – पंढरपूर ह्या संत गोरोबा काका महाराज पालखी मार्गास मंजूरी द्यावी.

या सर्व मागण्यांबाबत आदरणीय गडकरी साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन मागण्याबाबत संबंधितांना तात्काळ निर्देश दिले व ही कामे सुरू करण्याबाबत योग्य त्या सूचना वरीष्ठ अधिकारी वर्गाला मा साहेबांनी दिल्या

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here