बार्शी ;
शोरूम समोर लावलेल्या कार मधील लॅपटॉप व मोबाईल हँडसेट वर चोरट्यांनी डल्ला मारल्याचा प्रकार बार्शी लातूर रस्त्यावरील एका शोरूम समोर घडला.जितेंद्र तांबारे ,वय. 30वर्षे, रा.राऊत चाळ अशोकनगर बार्शी यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादीत म्हटले आहे की ते ट्रॅक्टरचे शोरुम लातुर रोड बार्शी या ठिकाणी मँनेजर म्हणुन काम पाहतात.सकाळी 09/30 वाचे सुमारास घरुन कारने शोरुम येथे नोकरीकरिता जाताना लॅपटॉप घेवुन ते ट्रॅक्टरचे शोरुम येथे ऑफिसकडे निघालो असताना मोबाईल हा चार्जिंग नसल्याने मोबाईल गाडीतच ठेवला होता. तसेच गाडीत लॅपटॉप व मोबाईल तेथेच ठेवुन गाडीचा दरवाजा बंद करुन ऑफिसकडे गेले.

ऑफिसचे काम संपवुन गाडीकडे आलो असता लाॅक उघडण्याकरिता असलेल्या फोर व्हीलरचे रिमोटने लाॅक उघडण्याचा प्रयत्न केला असता सदर लाॅक उघडलेचा आवाज आला नाही.त्यावेळी गाडीचा दरवाजा हाताने उघडला असता त्यावेळी माझी खात्री झाली की सकाळी ऑफिसकडे जात असताना गाडीचे लाॅक झालेच नाही. गाडीचा दरवाजा उघडुन गाडीत ठेवलेले लॅपटॉप व मोबाईल बघितला असता ते दिसुन आले नाही.
चोरट्यांनी 20 हजाराचा लॅपटॉप व पाच हजार रुपयांचा मोबाईल असा 25 हजाराचा ऐवज लंपास केला.याबाबत शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस करीत आहेत.