३० जूननंतर लॉकडाऊन उठणार की नाही , वाचा काय म्हणाले मुख्यमंत्री
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज पुन्हा फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता लॉकडाऊन अद्याप उठवता येणार नाही याची घोषणा घोषणा केली आहे. सध्या राज्यात विशेष करून मुंबई कोरोनाचा धोका पूर्णपणे टळलेला नाही आहे. त्यामुळे सध्यातरी मुंबईत लॉकडाऊन शिथिल करता येणार नाही अशी माहिती मुख्यमंत्रांनी दिली आहे.

पुढे बोलताना मुख्यमंत्र्यांनी डॉक्टरांचे आभार मानले. ते म्हणले की उद्याचा दिवस १ जुलै हा कोरोना यौद्धांचा असणार आहे. १ जुलै रोजी जागतिक डॉक्टर दिन आहे. तसेच १ जुलै शेतकरी दिन म्हणून साजरा करतो. या दोन्ही दिवसाकरता त्यांचे आभार मानले आहेत.
हळूहळू सोईसुविधा उघडत जाणार. पण लॉकडाऊन उघडणार का? तर त्याचं उत्तर नाही आहे. आजपासून सलून आणि पार्लर सेवा सुरू केलं आहे. अजूनही संकट टळलेलं नाही. मिशन बिगीन अगेन आहे पण धोका टळलेला नाही. अर्थचक्राला गती देण्यासाठी काही गोष्टी उघडत चाललो आहोत. काही गोष्टी उघडल्या म्हणजे धोका टळलं असं नाही. अनावश्यक कामासाठी बाहेर पडू नका असे आव्हान सुद्धा त्यांनी राज्यतील जनतेला केले आहे.

अजूनही धोका टळलेला नाही. लॉकडाऊन पुन्हा होऊ नये, म्हणून तुमचं सहकार्य अपेक्षित
डॉक्टरांना आवाहन की, रुग्णांना आपल्या कुटुंबीयांप्रमाणे समजा, भीती बाळगू नका
अजूनही हे काही काळ करावंच लागेल
आपल्याला सगळ्या खबरदाऱ्या घेतल्या पाहिजेत
विनाकारण, घराबाहेर पडू नका. लहानवृद्धाप्रमाणेच तरुणांनाही लागण होत आहे.
मला आतापर्यंत सहकार्य केलंत तसंच पुढे करत राहा.
शिक्षण, आरोग्य अशा सगळ्याच बाबतीत लक्ष देत आहोत.
अर्थचक्राला गती, स्थानिकांना रोजगार देण्याचाही प्रयत्न सुरू करण्यात आला आहे.
संकटकाळातही आपण गुंतवणूकदारांना रोखलेलं नाही.
गेल्या 15 दिवसात 16 हजार कोटींचे सामंजस्य करार केले आहेत. मला खात्री आहे की त्यांना याची कल्पना आहे. त्यामुळे आपल्याला परवानगी मिळेल ती आणखी तीन महिन्यांसाठी वाढवून देण्याची मागणी मी पंतप्रधानांना केली आहे.
30 जून रोजी केशरी रेशन कार्डासाठीची योजना संपत आहे.
लॉकडाऊन करायचा की नाही, हा प्रश्न आता मी तुम्हाला विचारतो आहे. गर्दी टाळणे, मास्क वापरणे या गोष्टी पाळणं गरजेचं आहे. कोरोनाला आपणहून बळी पडू नका
अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग, प्राथमिक सुरक्षा पाळली जात नाही.कुठेही घरात पाणी साचू देऊ नका, यापासून खबरदारी घ्या.
हे दिवस मलेरिया आणि डेंग्यूचे आहेत. ते कुठल्याही साचलेल्या पाण्यात त्यांच्या अळ्या सापडतात
शहरी भागातील लोकांना आवाहन आहे की, आपले सर्व कर्मचारी कोरोनासाठी लढत आहेत. पाऊस आनंदासह रोगराईही घेऊन येतो.पावसाळ्यात अनेक गोष्टींसाठी बैठक घ्यावी लागते.

आता पावसाळा सुरू झाला आहे. प्लाझ्मा, कोविड सेंटर, टेस्ट्स अशा सगळ्याच गोष्टीत वाढ करत आहोत.
आरोग्य सुविधेत आपण वाढ करत आहोत. सगळ्या ज्येष्ठ डॉक्टरांना विनंती आहे की रुग्णांवर उपचार सुरू करा, सरकार साहाय्य करेल डॉक्टरांच्या काळजीसाठी सरकार तत्पर आहे.
अनेक ज्येष्ठ वयाचे डॉक्टर हायरिस्क असूनही ते रुग्णालयात जात नाहीत, पण मी सांगू इच्छितो की काळजी करू नका
चेस द व्हायरस अशी नवी योजना मुंबईसह राज्यभरात अनेक ठिकाणी सुरू केली आहे.
रुग्णांची संख्या वाढत असली तरी तपासणीची संख्याही वाढवत आहोत. मोफत उपलब्ध होतील, असे प्रयत्न करत आहोत. रेमडेझेविर आणि पॅरिफेराविर ही औषधं उपलब्ध होत आहेत. आपण एप्रिल पासून दोन औषधांच्या पुरवठ्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा सुरू केला होता. जी औषधं आपल्याला गरजेची वाटतील ती औषधं वापरत आहोत.
मी कोरोनातून बरे झालेेल्यांना आवाहन करतो की, समोर या आणि प्लाझ्मा दान करा प्लाझ्मा थेरपीने अनेकांना वाचवता येऊ शकतं. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना प्लाझ्मा देण्याची विनंती करत आहे उद्या कदाचित आपलं राज्य प्लाझ्मा थेरपी सर्वाधिक वापर करणारं पहिलं राज्य ठरेल प्लाझ्मा थेरपी अत्यंत उपयोगी आहे.
कोरोनाशी युद्धात आपण जगाच्या बरोबर आहोत- मुख्यमंत्री
आपण मार्चपासून कोरोनाशी लढत आहोत, शक्य त्या पद्धतीने आपण लढत आहोत. रक्तदानासोबत प्लाझ्मा थेरपीचा विषयही गंभीर आहे माझ्या आवाहनाला प्रतिसाद देऊन तुम्ही रक्तदानही केलंत. विघ्नहर्त्याच्या साक्षीने आपल्याला महाराष्ट्र कोरोनामुक्त करायचा आहे
लोकमान्य टिळकांचा चळवळीचा वारसा आपण पुढे नेणार आहोत. आगमन किंवा विसर्जनाची मिरवणूक होणार नाही. पण, अद्यापही चर्चा सुरू आहे, त्यातून निश्चित मार्ग काढू
राज्यभर जिथे जिथे गणेशोत्सव होतील, तिथे जास्तीत जास्त चार फुटांची मूर्ती असावी.गणेशोत्सव मंडळांनीही सरकारच्या निर्णयाला समर्थन दिलं, त्यांचेही आभार.अनेक धर्मीयांचे सणवार येत आहेत, पण त्यात सामाजिक भान पाळणं गरजेचं आहे. गोविंदा पथकांनी स्वतःहून दहिहंडी उत्सव रद्द केल्याचं जाहीर केलं आहे.
तुमचा सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून मी विठुरायाल साकडं घालणार आहे. कोरोनाच्या संकटापासून महाराष्ट्रासह जगाला मुक्त कर, असं साकडं घालणार आहे. तुमच्या वतीने मी विठुरायाला साकडे घालणार आहे.नाईलाज म्हणून वारीचा सोहळा आटोपशीर करावा लागत आहे. वारीचा सोहळा आपल्या देशात होऊ शकतो, वारकऱ्यांनीही अत्यंत संयम दाखवला.आताही मी वारीला जाणार आहे. 2010 मध्ये मी वारकऱ्यांच्या अफाट समुद्रात मी विठुरायाचं विश्वरूप पाहिलं होळी, ईद, रामनवमी असे सगळे उत्सव तुम्ही साजरा करत आहात. सर्व धर्मीयांना विशेष धन्यवाद
बोगस बियाणांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार- अशा शेतकऱ्यांना बोगस बियाणं विकणाऱ्यांना शिक्षा जो शेतकरी कर्जमुक्तीपासून काही कारणाने अद्याप वंचित आहे, त्यालाही आता कर्जमुक्त करायचं आहे.
अनेक ठिकाणांहून बोगस बियाणांच्या तक्रारी येत आहेत, त्याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. आपल्यासाठी राबणाऱ्या शेतकऱ्यासोबत आपण राहिलं पाहिजे
ग्रामीण भागातील उद्योग सुरू झाले आहेत.
काही ठिकाणी लोकल सुरू झाल्या आहेत.
हे सरकार महाराष्ट्राची काळजी घेणारं सरकार आहे
आपल्यासाठी राबणाऱ्या शेतकऱ्यासोबत आपण राहिलं पाहिजे ग्रामीण भागातील उद्योग सुरू झाले आहेत.
काही ठिकाणी लोकल सुरू झाल्या आहेत.
हे सरकार महाराष्ट्राची काळजी घेणारं सरकार आहे
पण याचा अर्थ धोका टळलेला नाही.
अर्थचक्राला गती देण्यासाठी हळूहळू एकेक गोष्टी सुरू करत आहोत. आपला तोल सांभाळून संकटाला पार करायचं आहे.
आपण मिशन बिगिन अगेन याचा अर्थ धोका टळलेला नाही.
अजूनही संकट टळलेलं नाही. आपण काळजीपूर्वक पावलं टाकत आपण पुढे जात आहोत. कोरोनाचं संकट अजून टळलेलं नाही 30 जूननंतर लॉकडाऊन उठणार नाही. पण अत्यंत काळजीपूर्वक गोष्टी सुरू करत आहोत.
30 जून पर्यंत लॉकडाऊन आहे. पण हळूहळू आपण सर्व सुरू करत आहोत.
जीव जगवणाऱ्या डॉक्टर आणि शेतकऱ्यांना माझं वंदन
एक जुलै रोजी डॉक्टर दिन आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जन्मदिन.निसर्ग वादळाने ज्यांचं नुकसान झालं त्यासर्वांच्या पाठीशी सरकार आर्थिक नुकसान प्रचंड झालं आहे. निसर्ग चक्रिवादळात मनुष्यहानी कमीत कमी करण्यात यश